महाराष्ट्रराजकीय

पाण्यावाचून तडफडत मरत होते त्यावेळी यांच्या मेजवान्या सुरु होत्या -संजय राऊत

जेव्हा लोक पाण्यावाचून तडफडत मरत होते त्यावेळी यांच्या एसी शामियान्यात मेजवान्या सुरु होत्या. जे 14 लोक मेले त्यांच्या मृत्यूविषयी वाईट वाटू द्या. तुमची संवेदना मेली आहे. मेलेल्यांच्या मढ्यावरचे लोणी खाणारे हे सरकार आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

खारघरमध्ये पाण्याशिवाय श्रीसेवकांना तडफडून मारले असे म्हणत संजय राऊत यांनी 50 श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून राऊत यांच्या या वक्तव्याविरोधात शिवसेनेने मरिन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्या विरोधात दाखल केलेल्या या तक्रारीवरुन संजय राऊत आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.

हा सदोष मनुष्यवध

संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना सरकारचा समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले, खारघर दुर्घटने प्रकरणी सरकारने नेमलेली समिती आहे. ती कसे काम करेल याबाबत वेगळे सांगायला नको. आधी खारघर दुर्घटना कशी घडली ते सांगा. बाहेर लोक पाण्याशिवाय तडफडून मरत होते आणि आलेल्या पाहुण्यांसाठी शाही मेजवानी सुरु होती. त्याची चौकशी करणार आहात का? हा सदोष मनुष्यवध आहे. तुमची मस्ती शमवण्यासाठी लोकांचा जीव घेतला.

आकडा 50 वर जाऊ शकतो

संजय राऊत म्हणाले, पालघर साधु हत्याकांडानंतर अधिवेशनाची मागणी तुम्ही केली होती. आता हे अधिवेशनाच्या मागणीवर बोलायला तयार नाहीत. लोक मरत असताना मेजवान्या सुरु होत्या. खारघर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो. जे लोक मेलेत त्याला जाबाबदार असणाऱ्या गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा. आधी 9, मग 11 आता मृतांचा आकडा 14 वर आलाय. हा आकडा 50 वर जाऊ शकतो. माझी ही भूमिका आहे. मिंधे गटाला याचे वाईट का वाटत आहे, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

राजकीय चर्चा होणारच

संजय राऊत यांनी शरद पवार-गौतम अदानी भेटीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, राजकारणातले 2 व्यक्ती एकत्र आल्यावर राजकीय चर्चा होतेच. येत्या काळात याविषयी सविस्तर माहिती कळेलच. अदानी-पवार भेटीशी माझा संबंध नाही. एका मोठ्या नेत्याला वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक भेटत असतातच.

मराठा समाजाच्या निर्णयात कमी पडले

संजय राऊतांनी यावेळी मराठा आरक्षणावरुन सरकारवर टीका केली. राऊत म्हणाले, सध्याचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते असताना आम्हाला सत्तेत येऊ द्या 2 दिवसात मराठा आरक्षण देतो, असे म्हणत होते. आम्ही वाट पाहतोय. धनगर, मराठा समाज वाट पाहत आहेत. आता 9 महिन्यापासून तुमच्याकडे सत्ता आहे. धनुष्यबाण काढून घेताना तत्परतेने निर्णय घेतला मात्र मराठा समाजाच्या निर्णयात कुठे कमी पडले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel