सोलापूर बातमीsolapurpoliceमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

पोलीस अधीक्षकांच्या अभिनव उपक्रमाची सुरूवात…

" पहाट " - गुन्हेगारीच्या अंधारातून बाहेर पडण्यासाठी सोनेरी किरण...

अतुल कुलकणी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी पोलीस खात्याच्या अभिलेख पाहता मालमत्तचे गुन्ह्यातील मोठ्या प्रमाणातील आरोपी हे पारधी समाजातील असल्याचे लक्षात आल्यानंतर या समाजातील लोकांना गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी ” पहाट” हा अभिनव उपक्रम सुरूवात केली आहे. सदर उपक्रमाची सुरूवात आज दिनांक ०६,०९,२०२४ रोजी पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉलमधील पारधी समाज बांधवाच्या मेळाव्याने केली आहे.

मा. श्री. अतुल कुलकणी, पोलीस अधीक्षक यांनी पारधी समाजातील युवक हे रोजी-रोटीसाठी अनावधानाने गुन्हे करत असून त्यामध्ये अटक झाल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी पुन्हा गुन्हेगारी, पुन्हा अटक हे दुष्टचक भेदण्यासाठी पोलीस खात्याकडून मदत केली जाणार आहे. तसेच या समाजातील लोकांना सरकारी योजना व नोकऱ्यांचा फायदा होण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड व जातीचा दाखला अशी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या वस्तीवर महसूल विभागाकडून विशेष कॅम्प आयोजीत केले जाणार असल्याची माहिती यांनी दिली. तसेच या समाजातील शिक्षीत युवकांना सरकारी नोकरी मिळण्यासाठी शिकवणी, भरतीपूर्व प्रशिक्षण यासारख्या सुविधा उपलब्ध करून देणार असून बेरोजगार लोकांना रोजगार मिळवून देणार आहेत. मा.श्री. अतुल कुलकर्णी हे धाराशिव येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असताना हा उपक्रम राबवला होता. त्यामध्ये जिल्ह्यातील लोकांना भरतीपूर्व प्रशिक्षण, मुलांच्या शिक्षणासाठी शाळा, रोजगार उपलब्ध करून दिले असल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदा झाला असल्याची माहिती दिली.

सदर मेळाव्यास श्री. सरतापे, सहायक संचालक, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प हे हजर होते. त्यांच्या विभागाकडून पारधी समाजासाठी देण्यात येत असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच यापुढे पोलीस विभागाच्या माध्यमातून योजनांचा लाभ हा सर्व समाजापर्यंत पोहवणार असल्याची माहिती दिली.

सदर मेळाव्यास मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालायतील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. सोलापूर ग्रामीण यांनी केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel