प्रणिती शिंदेंच्या विजयात सर्वात मोठा वाटा एमआयएम पक्षाच आणि मुस्लिम सामुदायाचा
सोलापूर शहर मध्यची जागा एमआयएम जिंकणारच;मोहसीन मैनदर्गीकर यांचा आत्मविश्वास
सोलापूर:लोकसभा निवडणुकी नंतर काही महिन्यात विधानसभा निवडणुका संपन्न होणार आहेत.एमआयएमने सोलापूर लोकसभा मतदार संघात उमेदवार न देता काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर उपकार केले आहे.सोलापुरातील मुस्लिम समाजाने भरघोस मतदान करून प्रणिती शिंदेंना मोलाची मदत केली आहे.
संविधान वाचवण्यासाठी एमआयएमने सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार दिला नव्हता.आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहरमध्यच्या जागेवर फारूक शाब्दी आमदारकी लढवणार आहेत.काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमला मदत करावी ,अशी अपेक्षा एमआयएमचे शहर युवक अध्यक्ष मोहसीन मैनदर्गीकर यांनी व्यक्त केली आहे.
प्रणिती शिंदेंना मुस्लिम समाजाने मोठे मताधिक्य दिले आहे.देशाच्या संसदेत प्रणिती शिंदेंनी मुस्लिम समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे आवाहन मोहसीन मैनदर्गीकर यांनी केले आहे.सोलापूर जिल्ह्यात एमआयएम पक्षाचे शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी हे 2019 पासून सोलापुरात विविध विकासकामे करत आहेत.गोरगरीब ,सर्वसामान्य नागरीकांची मदत करत आहेत.2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फारूक शाब्दी हे नक्की निवडून येतील असा विश्वास एमआयएम युवक अध्यक्षकांनी व्यक्त केला आहे.सोलापूर शहर मध्यसह इतर विधानसभा मतदारसंघात एमआयएम उमेदवार देणार आहे असेही युवक अध्यक्षकांनी माध्यमांना माहिती दिली आहे.