महाराष्ट्र

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याची प्रकृती बिघडली; ICU मध्ये दाखल, नेमकं काय झालं?

साऊथ अभिनेत्री महालक्ष्मीने निर्माता रविंद्र चंद्रशेखरसोबत लग्न केलं आहे. त्यांचं लग्न सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे त्यांची जोडी. काही नेटिझन्स त्यांच्या जोडीला अनमॅच्ड म्हणतात.

त्यामुळे कधी कधी लोक त्यांना खूप ट्रोल देखील करतात. महालक्ष्मी आणि रविंद्र यांना सोशल मीडिया युजर्सची कधीच भीती वाटली नाही. ते दोघंही नेहमीच इंटरनेटवर आपले प्रेम व्यक्त करत असतात. दोघांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीची प्रकृती बिघडली असून त्याला आता ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे. लोकप्रिय निर्माता आणि लिब्रा प्रोडक्शनचा मालक रविंद्र चंद्रशेखर हा एका आठवड्यापासून रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल आहे. त्याच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रविंद्रला श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. यानंतर आता त्याच्या नाकामध्ये ऑक्सिजन ट्यूब टाकण्यात आली आहे.

रविंद्रला भयंकर लंग इन्फेक्शन देखील झालं आहे. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आणखी काही दिवस रविंद्रला रुग्णालयात राहावं लागणार आहे. महालक्ष्मीचे दुसऱ्यांदा एका निर्मात्याशी लग्न झाले आहे. याआधी अभिनेत्रीने अनिल नेरेदिमिलीसोबत लग्न केलं होतं. तो आधीच विवाहित होता आणि त्याला एक मूलही आहे. याच दरम्यान, दोघांमध्ये अनेक वाद झाले.

रिपोर्ट्सनुसार, या वादांमध्ये निर्माता रविंद्र चंद्रशेखरने तिला खूप पाठिंबा दिला होता. दरम्यान, प्रेमात फसवणूक झालेली अभिनेत्री त्याच्या खूप जवळ आली होती. नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर 2022 मध्ये दोघांनी लग्न केलं. महालक्ष्मी आणि रविंद्र यांच्या लग्नाची पहिल्या दिवसापासूनच चर्चा आहे. त्यांचे हनिमूनचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते काही महिन्यांपूर्वी रविंद्रने आपल्या सुंदर पत्नीसाठी एक खास पोस्ट लिहून तिचे आठवे आश्चर्य म्हणून वर्णन केलं होतं.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel