सोलापूर बातमी

प्रहारचा दणका;वादग्रस्त तहसीलदार प्रशांत बेडसे अखेर निलंबित

सोलापूरच्या तत्कालीन तहसीलदाराला प्रहारचा दणका... शासनाने केले थेट निलंबित

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांना राज्य शासनाने निलंबित केले आहे.मोहोळ तालुक्यात प्रशांत बेडसे यांनी पदभार घेतल्या नंतर अनेक नागरिकांशी वादविवाद झाला होता.प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यां सोबत सुद्धा त्यांनी असभ्य वर्तन करत अपमानास्पद वागणूक दिली होती. तसेच प्रहार चे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्यावर खोटा खंडणी सारखा गुन्हा दाखल केलेला त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अनेक आक्रमक आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले होते तसेच राज्य शासन व विभागीय आयुक्ताकडे वारंवार तक्रार करून तहसीलदार प्रशांत बेंडसे यांच्यावर निलंबनाची कारवाईची मागणी केली होती. महाराष्ट्र शासनच्या वतीने आज महसूल वन विभागाने निलंबित केल्याचे आदेश पारित केले आहे.

सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणे,पदावर असताना कोविड-१९च्या नियमांचे उल्लंघन करणे,वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे , खोटे गुन्हे दाखल करणे अशा प्राप्त तक्रारीवरून राज्य शासनाने निलंबनाचे आदेश पारित केलेला आहे.

प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यां सोबत प्रशांत बेडसे थेट भिडले होते.तसेच मोहोळ मध्ये हजर नसताना तसेच कोणत्याही प्रकारे खंडणीची मागणी न केला असता सुद्धा शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांच्यावर खंडणी सारखा गुन्हा दाखल झाल्याने प्रहारने उच्च न्यायालयातही दाद मागितली होती. राज्य शासनाच्या महसूल विभागात प्रहार पक्षाच्या अजित कुलकर्णी,जमीर शेख,खालिद मणियार आदीनी पाठपुरावा करत मोहोळ तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार यांना निलंबित करावे अशी मागणी केली होती.निलंबित तहसीलदार प्रशांत बेंडसे हे मोहोळ येथून बदली होऊन गेले आहेत.पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे तहसीलदार होते. तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसेवर निलंबनाची कारवाई झाल्याने प्रहार पक्षाने आनंदोत्सव साजरा करत मिठाई वाटप केले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel