प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासना मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक गतिमान व वेळेत मिळाव्या म्हणून महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा पारित करण्यात आला.
नागरिकांना सुलभ वेळेत सेवा मिळाव्या हे जरी उद्दीष्ट असले तरी प्रकरण/फाईल दाखल केल्या पासून 7 दिवसाच्या आत मार्गी लगाव्या असा कायदा असला तरी देखील माढा तालुक्यातील सर्व विभागाच्या कार्यालयात त्या फाईल महिनो महिने तशाच त्या टेबल ला पडून असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या अधिकाऱ्याच्या टेबलला फाईल वेळेपेक्षा जास्त दिवस पडून असल्याने त्याचा हेतू वेगळा असल्याचे दिसुन येत . सर्व फाईल ह्या 7 दिवसात मार्गी लावाव्यात आणि वेळेत फाईल मार्गी न लावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे वर शिस्त भंगाची कारवाई करण्यात यावी. सदरची कारवाई त्वरित न झाल्यास दिनांक 18 जून 2024 रोजी मौजे उंदर गाव येथे सकाळी 9 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांनी दिला आहे.
त्या प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके,तालुका अध्यक्ष अमोल केसरे, विध्यार्थी तालुका उपाध्यक्ष संतोष कोळी, बिरुदेव शेळके, किरण लवटे, धीरज भांगे वामन तांबीले , काका शेळके, बंडू आगलावे , औदुंबर भुसारे, राहुल गाडे उपस्थित होते.