प्राणघातक हल्ला प्रकरणी एकास जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून अटकपूर्व जामीन मंजूर…
वरील प्रकरणात वळसंग पोलिस ठाणे अंतर्गत गुन्हे क्रमांक २२२/२०२४ अन्वये भा.द.वी कलम ३०७,३२४,३२३,४२७,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ प्रमाणे यातील आरोपी संजय उर्फ पिंटू दत्तात्रय जाधव व इतरांविरुद्ध दिनांक २३/०५/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर प्रकरणात यातील फिर्यादी देविदास जाधव यांची राजू बलभीम जाधव यांच्याविरुद्ध पूर्वीच्या भांडणावरून तसेच दिनांक २०/०५/२०२४ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास यातील फिर्यादी हे भावाचे घरी जेवण करून परत येत असताना आरोपी राजु जाधव हा फिर्यादीचे गाडी समोर येऊन त्यास थांबवले असता त्यावेळी आरोपी पिंटू उर्फ संजय दत्तात्रय जाधव यांनी कुऱ्हाडीने फिर्यादीवर वार केला तसेच इतर आरोपींनी देखील फिर्यादीवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी सळी, तलवार व लाथा बुक्क्यांनी मारहण केली तसेच शिवीगाळी आणि दमदाटी करून गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद देण्यात आली होती. आरोपी राजू जाधव यांच्यावर फिर्यादीने दाखल केलेले बलात्काराचा गुन्ह्याचा राग मनात धरून तसेच आरोपी राजू जाधव हा त्या गुन्ह्यामध्ये ३ वर्ष शिक्षा भोगून आले असल्याने तुला जिवंत सोडत नाही असे म्हणून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर फिर्यादीला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. आरोपीने आपला अटकपूर्व जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता.त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री खुणे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी , ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. निलेश कट्टीमनी, ॲड. सोहेल रामपुरे त्यांनी काम पाहिले