राजकीय

फडणवीसांनी लिहिलेली जिलेटिन नाट्याची स्क्रिप्ट अंबानींच्या घरासमोरील – नाना पटोले‎

अंबानींच्या घरासमोर जिलेटिन‎ ठेवण्याच्या घटनेनंतर घडत गेलेला‎ नाट्यक्रम आणि त्याचा शेवट राज्याचे‎ तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख‎ जेलमध्ये जाण्यात झाला. ही सर्व‎ स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांनी‎ लिहिलेली होती, हे मी तेव्हा म्हटले‎ होते. पण आता ते खरे ठरताना दिसत‎ आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष‎ नाना पटोले यांनी येथे माध्यमांशी‎ बोलताना व्यक्त केले.

महाराष्ट्राला‎ कलंक लावण्यासाठी, राज्यात सत्ता‎ मिळवण्यासाठी मोदी सरकारने सत्तेचा‎ दुरुपयोग केला, की राज्याच्या भाजप‎ नेत्यांनी हे काम केले. हेसुद्धा आता‎ कळायला लागले आहे. राज्याच्या‎ प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम‎ भाजपच्या लोकांनी केले. तेव्हा‎ गृहमंत्र्यांनी हे प्रकरण आता स्पष्ट केले‎ पाहिजे. अंबानीच्या घरासमोर‎ जिलेटिन ठेवण्याच्या नाट्याचा‎ खुलासा त्यांनी करावा, ही आमची‎ मागणी असून विधानसभेतही हा प्रश्‍न‎ उपस्थित करणार असल्याचे पटोले‎ यांनी सांगितले.‎

मी विधानसभा अध्यक्ष असताना‎ एकदा दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी‎ लोकसभेच्या अध्यक्षांनी तुमच्याकडे‎ परमबीर सिंह नावाचे आयपीएस‎ अधिकारी आहेत, त्यांच्या‎ भ्रष्टाचाराची फाईल आमच्याकडे‎ आली आहे, पीएमओकडेही गेली‎ आहे आणि राज्याच्या‎ मुख्यमंत्र्यांकडेही गेली आहे असे‎ त्यांनी सांगितल्याचे पटोले म्हणाले.‎ आणि त्यानंतर परमबीर सिंह हा‎ खरोखरच भ्रष्ट अधिकारी आहे, हे‎ सिद्ध झाले.‎ परमबीर सिंह यांच्या बाबतीत मुंबई‎ उच्च न्यायालयाने त्यांच्या निलंबनाला‎ विनाकारण मुदतवाढ देण्यात येत‎ असल्याचे निरीक्षण नोंदवले होते.‎ यामध्ये कॅटच्या आदेशाचेही उल्लंघन‎ झाले. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे‎ पालन सरकारने केले नाही.‎ अँटेलियामध्ये स्फोटके ठेवण्याचे‎ नाट्य पूर्व नियोजित होते असा‎ आरोपही पटोले यांनी केला.‎ त्यावेळी ही फडणवीसांनी‎ ठरवलेली स्क्रिप्ट आहे असे मी‎ विधानसभेतही सांगितले होते. ते आता‎ खरे होताना दिसत आहे. कारण‎ फडणवीसांनी गृहमंत्र्यांवर तो आरोप‎ केला होता. अनिल देशमुखांच्या‎ प्रकरणात १०० कोटींचा हिशोब‎ शेवटपर्यंत लागलाच नाही. ते आणले‎ कुठून, हा प्रश्‍न तेव्हाही निर्माण झाला‎ होता आणि परवा परमबीर सिंह यांच्या‎ बाबतीत देण्यात आलेल्या आदेशात‎ उच्च न्यायालय आणि कॅटच्या‎ आदेशाचेही पालन करण्यात आले‎ नाही. फडणवीसांनी आणि केंद्र‎ सरकारने महाराष्ट्राला बदनाम‎ करण्यासाठी कट केला होता. सरकारने‎ तांत्रिकदृष्ट्या कॅटच्या फेऱ्यातून‎ परमबीर सिंहला बाहेर काढले. त्याला‎ देशमुखांच्या विरोधात प्यादा म्हणून‎ वापरले, असेही पटोले म्हणाले.‎

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel