फसवून लग्न केल्याच्या आरोपातून मुक्तता…
जालना येथे राहणारी सुरेखा प्रकाश जानगवळी हिचे बरोबर पूर्वी झालेले दोन लग्ने लपवून ठेऊन फसवणूक करून विवाह करून रक्कम घेतली रक्कमेची मागणी केली शारिरीक मानसिक छळ केला म्हणून जाच हाट फसवणूकीचा आणि तीन लग्न केल्याबाबतची फिर्याद जोडभावी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि नं.३८०/२०२१ प्रमाणे प्रकाश महादेव जानगवळी रा. गवळी वस्ती श्रीदेवी नगर एम आय डी सी सोलापूर यांचे विरूद्ध तीन्ही पत्नीनी मिळून दाखल करण्यात आलेली होती. पोलिस अधिकारी प्रवीण धाईगडे यांनी गुन्ह्याचा तपास करून मे कोर्टात दोषारोप पत्र नियमीत फौजदारी खटला क्रं-३८०/२०२१ प्रमाणे दाखल केलेला होता. प्रस्तुतचा खटला सुनावणी करीता विनायम एम. रेडकर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर यांचे समोर आला असता सरकार तर्फे फिर्यादीचा भाऊ गणेश झारखंडे तीन साक्षीदार व तपास अमलदार यांना तपासण्यात आलेले होते.
आरोपीतर्फे माहितगार वकील अॅड. अजमोद्दीन शेख यांनी फिर्यादीनेच कायदेशीर घटस्फोट न घेता आरोपीची फसवणूक करून लग्न केले आहे आरोपीने मे कोर्टातून घटस्फोट मिळवून विवाह केलेला आहे. विवाहपूर्व माहेरच्या लोकांना आरोपी बद्दल माहिती देण्यात आली होती फिर्यादीस फिर्याद दाखल करण्याचा अधिकार नाही असा युक्तीवाद मांडला असता मे. कोर्टानी गुन्हे शाबीत करण्यास सफशेल अपयश आल्याचे कारण देऊन प्रकाश जानगवळी यांची निर्दोष मुक्तता केली
याकामी अँड. अजमोद्दीन शेख, अँड. सैफोद्दीन शेख, यांनी काम पाहिले.