फारूक शाब्दीच्या हस्ते आदर्श शिक्षकांना चिराग ए रहगुजर अवॉर्ड वितरित…
हाजी फारूक शाब्दी एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्ट सोलापूर यांच्या वतीने आदर्श शिक्षकांना चिराग ए रहगुजर अवॉर्ड देण्यात आले. 170 शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला. सोलापुरातील विविध संस्थांत काम करणाऱ्या सर्व माध्यमाच्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचारी यांना पुरस्कार देण्यात आला. उर्दू भाषा जिवंत ठेवण्याचा काम सोलापुरातील शिक्षक करत आहेत. शिक्षक हे समाजातील जादूगार आहेत.विद्यार्थी हे शाळेत जाताना लहानपणी सुरुवातीला रडतात ,मात्र शालेय शिक्षण संपूर्ण होताना दहावीचे वर्ग संपल्यावर तोच विद्यार्थी रडत जातो.आई वडिलांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहे,म्हणून आपणासमोर थांबून भाषण करू शकलो. माझे नाव फारूक शाब्दी आहे, असे सांगत फारूक शाब्दी यांनी स्वतःची ओळख करून दिली.छोट्याश्या गावातून मी आलोय,माझे वडील फक्त पाचवी पर्यंत शिक्षण घेतले आहे,परंतु त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात मोठी शिक्षण संस्था उभी केली.माझ्या वाडीलांनी गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडले होते.इतरांचे शिक्षण अर्धवट होऊ नये यासाठी माझ्या वडिलांनी शिक्षण संस्था उभी केली. सोलापुरातील अनेक शिक्षक आमच्या शिक्षण संस्थेतून डीएडचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासोबत माझे घनिष्ट नाते आहे असे सांगत हाजी फारूक शाब्दी यांनी उपस्थित शिक्षकांना संबोधित केले.
रविवारी सायंकाळी गुलाम पैलवान येथील हॉल मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना राजा बागवान यांनी केली.अब्दुल्ला डोंनगावकर ,अजहर चितापुरे यांनी स्वागतपर भाषण केले केले. मुजमिल वड्डो यांनी फारूक शाब्दी यांचे स्वागत केले.नीजामुद्दीन शेख यांचा सत्कार करण्यात आला. निजामुद्दीन शेख यांनी भाषण करत मनोगत व्यक्त केले.भाषणातून निजाम शेख यांनी शिक्षकांना अनेक सल्ले दिले.फारूक शाब्दी यांनी भाषण करताना सामाजिक सल्ला दिला.आपण सगळे जण एकत्रित होऊन सोलापुरातील प्रत्येक शाळांना काही तरी मदत केली पाहिजे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्ट च्या पदाधिकार्यानी व आदींनी परिश्रम घेतले