सोलापूर निधन वार्तासोलापूर बातमी

भाजपचे जुने जेष्ठ कार्यकर्ते रवींद्र राळेरासेकर यांचे निधन…!

भाजपच्या स्थापनेपासून सक्रिय कार्यरत असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते,कामगार न्यायालयातील ज्येष्ठ वकील व शुभराय महाराज मठाच्या रथाचे मानकरी रवींद्र रामकृष्ण राळेरासकर(८६) यांचे पुण्यातील धनकवडी येथील त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई,नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे.
रवींद्र राळेरासकर हे दत्त चौकातील शनी मंदिरा जवळ रहात होते. काही वर्षांपूर्वी ते पुणे येथे स्थायिक झाले होते. भाजपच्या स्थापनेपासून ते पक्षाचे सक्रिय व समर्पित कार्यकर्ते होते. 1985 मध्ये त्यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक भाजप तर्फे लढविली होती. सोलापुरात पक्ष वाढविण्यात इतर अनेक नेत्यांबरोबर त्यांचाही मोठा हातभार.त्यांनी अनेक नवीन कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊन घडविले होते.
रवींद्र राळेरासकर हे कामगार न्यायालयातील ज्येष्ठ वकील ही होते. दत्त चौकातील शुभराय महाराज मठातून दरवर्षी आषाढी एकादशीला रथ निघत असतो. त्या रथाचे ते परंपरागत मानकरी ही होते. रवींद्र राळेरासकर यांच्या आत्म्यास शांती लाभावी ही ईश्वरचरणी प्रार्थना!

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia