सोलापूर क्राईमक्राईमन्यायालय निर्णयमहाराष्ट्रसोलापूर बातमी

फिर्यादीची फसवणूक केल्याच्या प्रकरणांमधून दोन आरोपींची जामिनावर मुक्तता..!

यात हकीकत अशी की नमूद गुन्ह्यातील फिर्यादी नामे इम्रान युनिक शेख राहणार मजरेवाडी,नई जिंदगी सोलापूर यांनी 2014 साली मौजे मजरेवाडी हद्दीत नवीन सर्वे नंबर 65/1ब यामध्ये प्लॉट नंबर 463,464,475,476,451,452 असे प्रत्येकी 1000 स्क्वेअर फुट प्रमाणे सहा प्लॉट एकूण 6000 स्क्वेअर फुट जागा विकत घेतली होती. व त्यानुसार फिर्यादी यांनी सदर जागेला सिमेंट खांब लावून ताबा वहिवाट ठेवला होता.सदर प्लॉट पैकी प्लॉट नंबर 451 व 463 असे दोन प्लॉट फिर्यादी यांनी विक्री केले होते.
सदर प्लॉट पैकी फिर्यादी यांचा प्लॉट क्रमांक 475 बाबत आरोपी नामे श्री गौस पिरजादे यांनी महिला नामे निकत परवीन फिदा हुसेन मणियार यांचे आधार कार्ड मिळवून त्यांच्या जागी दुसरीच महिला उभी करून महानगरपालिकेला मिळकत करा ला नोंद करून सन 2022 चा मिळकत कर 08/07/2022 रोजी भरला व त्यानंतर त्याने निकत परवीन फिदा हुसेन मणियार यांच्या जागी दुसरीच महिला उभी करून 07/07/2022 रोजी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर कब्जा पावती करून घेतली व त्यासाठी साक्षीदार न वापरता ऍडव्होकेट नामे डी.एन कोडम यांची सही व शिक्का लिहून देणार व घेणार त्यांना ओळखतो म्हणून घेऊन सदर नोटरी बनवून कब्जा पावती करून त्यानंतर फिर्यादी यांच्या जागेवर शेड उभा करून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे म्हणून फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 420,467,468,471,447,506,34 प्रमाणे आरोपी जुबेदा शफिक शेख,मुनीर अहमद मेहबूबसाब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणांमध्ये आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती
यात आरोपी जुबेदा शफीक शेख,मुनीर अहमद मेहबूब साब शेख यांच्यावतीने ॲड अखिल शाक्य यांनी वकीलपत्र दाखल केले होते.आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी मॅडम यांनी प्रत्येकी 25 हजार रुपयाच्या जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश केला.

यात आरोपीतर्फे ॲड अखिल शाक्य, ॲड हर्षल शाक्य,ॲड दर्शना चक्रवर्ती,ॲड अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले..!

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel