सोलापूर बातमीसोलापूर क्राईम

फौजदार चावडी पोलीस ठाणे DB पथक ची दमदार कामगिरी…

सोनसाखळी हिसकावणारा पर-जिल्हयातील मोक्का सारखे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार तसेच घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार यांच्या मुसक्या आवळुन एकुण ४,१०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

फिर्यादी नामे कु. मिनाक्षी साहेबराव फंड, वय ४९ वर्षे, व्यवसाय शिक्षिका, राहणार- मु.पो. रेल्वे पंप रोड, पाण्याच्या टाकी जवळ, रेल्वे कॉटर्सच्या मागे, शहाबाद रेल्वे स्टेशन जवळ, शहाबाद, तालुका शहाबाद, जिल्हा- कलबुर्गी, राज्य कर्नाटक हे दिनांक १३/०७/२०२४ रोजी ०३.०० वा.च्या सुमारास स्टार मॉल, मरीआई चोक, सोलापूर याठिकाणी माझ्या गळयातील सोन्याची चैन व येवले चहाचे दुकानाचे समोर, पार्क चौक, सोलापूर येथून मिनाक्षी भालचंद्र कडुसकर यांच्या गळयातील सोन्याची साधी मण्याची माळ ही अज्ञात दुचाकीस्वार इसमांनी आमचे संमतीशिवाय लबाडीने, हिसकावून चोरून नेले आहेत म्हणुन वगैरे मजकुराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नमुद गुन्हयामधील अज्ञात चोरटयाचा शोध घेत असताना दिनांक १९/०७/२०२४ रोजी पोलीसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बार्शी रोडवरील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे, यांचे नियोजित स्व. काका महाजन शैक्षणिक संकुल बाळे, सोलापूर येथे महिलांच्या गळयातील सोनसाखळी हिसकावनारा परजिल्हयातील मोक्का मधील सराईत गुन्हेगार नामे दिपक परशुराम माळी, वय २५ वर्षे, राहणार सर्व्हे नंबर ०५, केशवनगर ग्रामपंचायतच्या बाजुला, मुंढवा, पुणे यास ताब्यात घेवुन त्याच्याकडुन गुरनं-४४०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४(२), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हया मधील एकुण १,७०,०००/- रू चा एकुण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तसेच फिर्यादी नामे- श्रीमती नेहा सागर चौहान, वय ३५ वर्षे, व्यवसाय खा. नोकरी, राहणार युनायटेड विहार अपार्टमेंट, बि.नं. A, ब्लॉक नं. १६, मुरारजी पेठ, स्प्रेलापूर यांचे आई-वडील रहात असलेल्या जुनि-मिल कंपाऊंड, MSEB ऑफीस जवळ, निर्गुल निवास, सोलापूर येथील राहते घराचे दिनांक १९/०७/२०२४ रोजी दुपारी ०२.०० वा.ते ०२.४० वा.च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कोयंडा कशाने तरी तोडुन घरात आत प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे म्हणून वगैरे मजकुराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नमुद गुन्हयामधील अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना दिनांक २०/०७/२०२४ रोजी नमुद गुन्हयात्तील आरोपी नामे बाबु खाजाप्पा मुंगळी (मुंगळे), वय २९ वर्षे, राहणार प्लॉट नंबर ८७, राजीव गांधी नगर, शांतीनगर रोड, आंबाबाई मंदिराचे पाठीमागे, नई जिंदगी, सोलापूर हा जुना पुना नाका, गणेश नगर जवळील ब्रिजखाली, मडकी वस्ती, सोलापूर ‘येथुन त्याचेकडील बजाज पल्सर मोटार सायकलवरून सोलापुरच्या दिशेने येणार असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने सदर टिकाणी सापळा रचुन त्यास जुना पुना नाका, गणेश नगर जवळील ब्रिजखाली, मडकी वस्ती, सोलापूर येथे शिताफीने पकडुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन फौजदार चावडी पोलीस ठाणे कडील गु.रं.नं. ४५२/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०५ (A), ३३१ (३) प्रमाणे दाखल गुन्हया मधील एकुण २,४०,०००/- रूपये मुद्देमाल जप्त केलेला आहे.

वरील दोन्ही साराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळुन १) गुरनं-४४०/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०४ (२), ३(५) प्रमाणे रदाखल गुन्हया मधील १,७०,०००/- किंमतीचा मुद्देमाल व २) गु.रं.नं. ४५२/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०५(A), ३३१ (३) प्रमाणे दाखल गुन्हया मधील २,४०,०००/- किंमतीचा मुद्देमाल असे एकुण ४,१०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त श्री. एम राजकुमार साो, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) श्री. विजय कबाडे मा. सहा. पोलीस आयुक्त विभाग-१, अशोक तोरडमल, चगोनि दिलीप शिंदे, दुयोनि विकास देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोह अजय पाडवी, पोह/प्रविण चुंगे, पोना/शिवानंद भिमदे, पोना/आयाज बागलकोटे, पोकों/कृष्णा बडुरे, पोकों/अमोल पोकों/ खरटमल, पोको/विनोदकुमार पुजारी, पोको/ विनोद व्हटकर, पोकों शशिकात दराडे, पोको ज्ञानेश्वर गायकवाड, पोकों/अर्जुन गायकवाड, पोकों सचिनकुमार लवटे, पोकों/तोसीफ शेख, पोकों/नितीन मोरे, पोकों/अजय चव्हाण, पोकों/पंकज घाडगे, पोकों/सुधाकर मानें, पोको अतिश पाटील, यांनी केलेली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel