सोलापूर बातमीSolapur court matterन्यायालय निर्णयमहाराष्ट्रसोलापूर क्राईम

बनावट बांधकाम परवाने प्रकरणी सोलापूर महानगरपालिकेच्या ४ परवानाधारक इंजिनीयरला जामीन मंजूर-अँड. रियाज एन शेख

जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग येथे कार्यरत असणाऱ्या तत्कालीन सहाय्यक अभियंता- श्री जाकीर हुसेन अल्लाबक्ष नाईकवाडी, कनिष्ठ अभियंता श्री श्रीकांत बसना खानापुरे व शिवशंकर बळवंत घाटे व कनिष्ठ श्रेणी लिपिक-श्री आनंद वसंत क्षीरसागर यांच्याशी संगणमत करून सोलापूर महानगरपालिकेतून खोटे व बनावट बांधकाम परवाने मिळविल्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील अटक झालेले परवानाधारक इंजिनियर सादिक मोहम्मद इस्माईल शेख, नावेद रईस शेख, मोहसिन हारून शेख रा- सोलापूर यांना येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रम सिंह भंडारी साहेब यांनी जामीनवर मुक्त करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.
घटनेची थोडक्यात हाकिकत अशी आहे की,

सोलापूर महानगरपालिकेचे बांधकाम परवाना विभाग येथील उप अभियंता श्री. नीलकंठ शिवानंद मठपती यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली होती सदर फिर्यादीमध्ये त्यांनी तत्कालीन महापालिकेचे सहाय्यक अभियंता-श्री जाकीर हुसेन अल्लाबक्ष नाईकवाडी, कनिष्ठ अभियंता-श्री श्रीकांत बसना खानापुरे व शिवशंकर बळवंत घाटे व कनिष्ठ श्रेणी लिपिक श्री आनंद वसंत क्षीरसागर यांनी संगणमत करून महापालिकेमध्ये ऑफलाइन बांधकाम परवाने देणे बंद असताना व सर्व बांधकाम परवाने केवळ ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याकरिता बंधनकारक केलेले असताना सु‌द्धा जाणीवपूर्वक त्यांची बदली झालेली असताना व त्यांना अधिकार नसताना अधिकाराचा गैरवापर करून महापालिकेचे आर्थिक नुकसान करण्याचे हेतूने चुकीचे खोटे व बनावट बांधकाम परवाने दिले व सदर बांधकाम परवानाचे नोदी रजिस्टर मध्ये न घेता सदरचे दस्त है जाणीवपूर्वक नाश अथवा विल्हेवाट करुन महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला होता.

सदर दाखल गुन्ह्याचा तपास सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे करत होते व त्यांनी सदर तपासामध्ये महापालिकेचे परवानाधारक इंजिनियर नामे सादिक मोहम्मद इस्माईल शेख, नावेद रईस शेख, मोहसीन हारून शेख सर्व राहणार सोलापूर यांना दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी अचानक अटक केली होती व त्यांना दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी सोलापूर येथील न्यायालयामध्ये हजर करून त्यांचीरदिवसाची पोलीस कोठडी मंजूर करून घेतली होती. सदर आरोपींची दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर आम्ही आरोपी परवानाधारक इंजिनियर यांच्यामार्फत जामीन चा अर्ज सोलापूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये सादर केलेला होता. सदर जामीन अर्जावर मेहरबान न्यायालयाने सरकार वकिलांचे सरकारी वकिलांचे व तपासिक अधिकारी यांचे म्हणणे मागविले होते व जामीन अर्जाची सुनावणी आज रोजी घेण्यात आली. आज रोजी जामीन करिता परवानाधारक इंजिनिअर यांच्या वतीने युक्तिवाद करत असताना आम्ही परवानाधारक यांच्याविरुद्ध लावण्यात आलेले कलम है लागूच होत नाही इंजिनीयर यांचा कोणत्याही प्रकारचा सकृतदर्शनी सहभाग नाही बांधकाम परवानगी मिळण्याकरिता अर्ज सादर केल्यानंतर केलेली कार्यवाही ही महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली आहे शासनाच्या परिपत्रकान्वये ऑफलाइन अर्ज सादर करण्यात आलेले होते ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यास अडचणी असल्याचे शासनाच्या परिपत्रकामध्येच नमूद केलेले आहे पोलीस कोठडी दरम्यान परवानाधारक इंजिनिअर यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची रिकवरी अथवा डिस्कवरी झालेली नाही परवानाधारक इंजिनियर यांच्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप हे केवळ मोघम स्वरुपाचे असून कोणताही ठोस पुरावा नाही तसेच महापालिकेच्या वतीने नेमलेल्या चौकशी समितीमध्ये व पडताळणीमध्ये परवानाधारक इंजिनिअरचा कोणत्याही प्रकारचा सहभाग असल्याचा ठपका ठेवलेला नाही तसेच फिर्यादी जबाब देताना फिर्यादीने कोणतीही नावे आरोपींची परवानाधारक म्हणून नमूद केलेली नाहीत सुमारे ८महिने परवानाधारक इंजिनियर यांनी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करून त्यांचे सर्व कागदपत्र जमा केलेले असताना व त्यांना पोलिसांनी यापूर्वी साक्षीदार केलेले असताना सुद्धा अचानकपणे त्यांना आरोपी करून गुन्ह्यांमध्ये खोडसाळपणाने गुंतवलेले आहे तसेच लागू करण्यात आलेले सर्व कलमे है७वर्ष शिक्षेची असून सोलापूर महानगरपालिकेने अंतर्गत केलेल्या अनियमित्येला अथवा चुकीच्या कृत्याला आरोपी परवानाधारक इंजिनियर हे कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत असा युक्तिवाद करून जामीन देण्यासस विनंती केली असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील प्रत मुख्य न्यायालयांनाधिकारी मुख्य न्याय दंडाधिकारी श्री विक्रम सिंह भंडारी यांनीपरवानाधारक इंजिनियर यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जात उचलल्यावर जामीन मंजूर करून पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे आदेश पारित केलेले आहे व जामीन मंजूर केलेला आहे. सदर प्रकरणांमध्ये परवानाधारक इंजिनियर तर्फे एडवोकेट रियाज एन शेख यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे श्री अमर डोके यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel