सोलापूर राजकीयसोलापूर धार्मिक

देवेंद्र कोठेवर दोन दिवसात कार्यवाही पोलीस आयुक्त एम. राजकुमार

लेबर पार्टी प्रमुखांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट

सोलापूर : मुस्लीम समाजाच्या भावना दुखावून अपशब्द वापरुन समाजाची बदनामी केल्यामुळे देवेंद्र राजेश कोठे याचेविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करणेबाबत लेबर पार्टी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना समक्ष भेटून निवेदन सादर केले. यावेळेस पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी देवेंद्र कोठे यांचेविरुध्द २ ते ३ दिवसात कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन लेबर पार्टीच्या शिष्टमंडळास दिले.

दिनांक ०१ मे रोजी वालचंद कॉलेज शेजारी वल्याळ मैदानात भारतीय जनता पार्टीच्या जाहीर सभेत माजी नगरसेवक देवेंद्र राजेश कोठे यांनी “सोलापूर शहरातील नई जिंदगी आणि शास्त्री नगर भागात जवळपास ५० हजार जिहादी बांगलादेशी मुस्लीम घुसलेले आहेत उद्या आपले सरकार आल्यानंतर त्या सगळ्या मुस्लीम बांगलादेश्यांना ठेचून काढले पाहिजे, एका मुस्लमानाला ४ पत्नीसाठी ४ लाख रुपये मिळणार, लोक गमतीने विचारालेत एकतर चार लग्न करा नाहीतर भाजपाला मतदान करुन या लांड्यांचा बंदोबस्त करा” असे जाहिर सभेतून मुस्लीम समाजाला उद्देशून बोललेले आहे, सदरची बाब गंभीर आहे. देवेंद्र कोठे हे जाणून बुजून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सदर कृत्य केल्याचे निवेदनात म्हटले.

या शिष्टमंडळात लेबर पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद, शहर सचिव कॉम्रेड शंकर तुम्मा, शहराध्यक्ष कॉम्रेड एजाज शेख, उपाध्यक्ष कॉ. चंद्रशेखर बदलापूरे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष रफिक देगनाळकर, अहमद काझी, युवा अध्यक्ष मुज्जमिल पठाण, सेक्रेटरी बाबा बागवान उपस्थित होते. अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष कॉम्रेड एजाज शेख यांनी दिली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel