सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीय

मराठीची चिरफाड करणाऱ्यांना मनसेचा इशारा; राहुल नार्वेकरांना पाठवली बाराखडी आणि व्याकरणाची पुस्तके

मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा अवमान सहन करणार नाही; मनसेची आक्रमक भूमिका

मराठी भाषेचा सातत्याने अवमान करणाऱ्या सरकारचा तसेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडताना केलेल्या मराठी उच्चारांच्या चुकीच्या वापराचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूरच्या वतीने बुधवारी (दि. २४) अनोखे आंदोलन करण्यात आले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल नार्वेकर यांच्या पत्त्यावर मराठी बाराखडी, मराठी व्याकरणाची पुस्तके आणि काही नामवंत मराठी साहित्यिकांची पुस्तके पाठवून निषेध नोंदविला.
यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राची ओळख, स्वाभिमान आणि अस्मिता असल्याचे सांगितले. मराठी भाषेचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
“मराठी भाषा ही केवळ पुस्तकांपुरती मर्यादित नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. कोणत्याही पदावर बसलेल्या व्यक्तीपेक्षा मराठी भाषा आणि मराठी संस्कृती आमच्यासाठी मोठी आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी पाठविलेली बाराखडी आणि व्याकरणाची पुस्तके अभ्यासून मराठी भाषेचे ज्ञान आत्मसात करावे,” अशी भूमिका मनसेच्या वतीने मांडण्यात आली.
तसेच, मराठी भाषेबाबत निष्काळजीपणा सुरूच राहिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी मनसे कायम आक्रमक भूमिका घेईल, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहरअध्यक्ष जैनोद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माने,शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, विश्वास गजभार, अभिषेक इरकल,समर्थ माळगे,गोरक्ष उपरे,मयूर सोलनकर, विकास उपरे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia