सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

बहुजन शिक्षक महासंघाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन….

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर व राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांच्या हस्ते सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सचिव रवी देवकर, दत्तात्रय शिंदे, मुख्याध्यापक नितीन गायकवाड, गंगाधर शिवशरण, राम गायकवाड, प्राथमिक विभाग प्रमुख महेश क्षीरसागर, प्रा.अभिजित भंडारे, महानंदा शिंदे, महिला विभाग प्रतिनिधी निर्मला मौळे, कविता कदम, प्रिया कदम, राजेंद्र सोरटे, महिबूब तांबोळी, सिद्धेश्वर भुरले, शिवानंद चौगुले, एकोराम चौगुले, सुनील स्वामी, महादेव अवताडे, ईरफान शेख, भागवत देवकुळे, गुंडीराम साठे, दत्तात्रय बनसोडे, रोहित गायकवाड
आदी महासंघाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

यावेळी महानगरपालिकेच्या हिरवळीवर झालेल्या अभिवादन सभेत राम गायकवाड, बोधीप्रकाश गायकवाड, अण्णासाहेब भालशंकर, रमेश लोखंडे, प्रा. युवराज भोसले, प्रा. अभिजीत भंडारे, राजेंद्र सोरटे, महानंदा शिंदे, निर्मला मौळे, राम गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी व सभासदांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले. सूत्रसंचालन नितीन गायकवाड यांनी केले तर रोहित गायकवाड यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login