सोलापूर बातमी

बापरे…सोलापूर पोलीस रस्त्यावर नेमका घडले तरी काय…?

सोलापूर शहरात दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिन शांततेत आणि सुखरूप पार पडावा यासाठी आज बुधवारी सकाळी सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा भव्य रूट मार्च काढण्यात आला. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हा रूट मार्च अत्यंत महत्त्वाचा ठरला.

हा रूट मार्च सदर बझार पोलीस स्टेशनपासून सुरू झाला. त्यानंतर जगदंबा चौक, बेडरपुल, सिद्धार्थ चौक, कुंभार गल्ली, मौलाली चौक अशा दाट वस्तीच्या व गर्दीच्या भागातून मार्गक्रमण करत पुन्हा सदर पोलीस स्टेशन येथे समाप्त झाला. यावेळी नागरिकांनी रूट मार्चला मोठ्या उत्सुकतेने पाहिले.

या रूट मार्चमध्ये एसीपी दीलीप कl पवार, सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडगर, तसेच पोलीस कर्मचारी व होमगार्ड पथक सहभागी झाले होते. शहरातील वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दसरा आणि धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम व गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी शांतता, ऐक्य व बंधुभाव टिकवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login