बौद्ध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अण्णासाहेब भालशंकर…
बौद्ध संस्कृतीचे आदर्श दर्शन घडविण्याचा केला संकल्प...

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीने क्रांतीप्रवण झालेल्या सोलापूर नगरीमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अण्णासाहेब भालशंकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकारणी तसेच इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली.
सोलापूर शहरात येत्या मे महिन्यात बौद्ध साहित्य संमेलन आयोजित येणार आहे.
या संमेलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी सोलापुरातील शिक्षक सोसायटीमधील वेळूवन बुद्ध विहारात दुसरी नियोजन बैठक निवृत्त कार्यकारी अभियंता प्रभाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विविध सूचना केल्या.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे संमेलनाची रूपरेषा स्पष्ट केली. या बैठकीत स्वागताध्यक्ष, कार्यकारणी सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. पुढील बैठकांमध्ये टप्प्याटप्प्याने इतर विषय समित्यांच्या निवडी करण्यात येणार आहेत.
याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे निवृत्त सचिव रमेश उबाळे, अंगध मुके, अभियंता शेखर शिवशरण, प्रदीप ताकपेरे , डॉ. धम्मपाल माशाळकर, व्ही. डी. गायकवाड,
अरुण गायकवाड, निवृत्त मुख्याध्यापिका आशा शिवशरण, निर्मला कांबळे , विनोद जाधव आदींसह मान्यवरांनी आपल्या सूचना मांडल्या. यावेळी नागसेन माने, संग्राम सोनकांबळे, आगतराव बनसोडे, दत्तात्रय शिंदे , रोहित गायकवाड, डी. वाय. पांडगळे , चंद्रकांत बनसोडे , मारुती बेलभंडारे , अशोक इंगळे, लक्ष्मण बनसोडे आदींसह साहित्यिक, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी , सामाजिक कार्यकर्ते तसेच धम्म चळवळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन पदाधिकारी व कार्यकारणी अशी –
स्वागताध्यक्ष – महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, कोषाध्यक्ष किरण बनसोडे, समन्वयक डॉ. सुरेश कोरे, कार्यवाह – मनपा कर्मचारी पतसंस्थेचे माजी चेअरमन भालचंद्र साखरे, प्रा. वशिष्ठ सोनकांबळे,
कार्यकारणी सदस्य – प्रा. डॉ. संघप्रकाश दुड्डे , प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, कामगार नेते चांगदेव सोनवणे, चित्रकार विठ्ठल मोरे, व्ही. ए. गायकवाड, बी.डी. भोसले, सुमित्रा जाधव, धम्मरक्षिता कांबळे, शारदा गजभिये आदींची निवड करण्यात आली.
आदर्शवत असे संमेलन करण्याचा
प्रयत्न : स्वागताध्यक्ष भालशंकर
बौद्ध साहित्य हे प्राचीन, आदर्शवादी विचारांचे प्रेरणा स्तोत्र आहे. धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. बौद्ध साहित्य जगण्याची ऊर्जा देते. यामुळे सोलापुरातील बौद्ध साहित्य संमेलन सर्वांच्या सहभागातून शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी करूया. आदर्शवत असे संमेलन पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असा मानस नूतन स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी व्यक्त केला.