सोलापूर बातमी

ब्रेकिंग कादरी हॉस्पिटल वर पुन्हा गंभीर आरोप…

सोलापूर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. नई जिंदगी परिसरातील कादरी हॉस्पिटलवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लखन सुधाकर वाघमारे (वय ३५, राहणार शिवगंगा नगर, कुमठा नाका, सोलापूर) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज सकाळी हात दुखत असल्याने लखन हा कादरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला होते.
मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली. नातेवाईकांनी कादरी हॉस्पिटलवर गंभीर आरोप लावले असून, “योग्यरित्या ऑक्सिजन न मिळाल्याने लखन यांचा मृत्यू झाला,” असा थेट दावा केला आहे. तसेच, “लवकरात लवकर कादरी हॉस्पिटलवर कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अन्यथा मृतदेह हॉस्पिटलसमोर ठेवून आंदोलन करू,” असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.

या घटनेमुळे कादरी हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

अधिक माहिती नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली.

या घटनेवर कादरी हॉस्पिटल कडून अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही

या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel