सोलापूर पोलिस आयुक्तांचा दणका ,आणखी एकावर करण्यात आली MPDA खाली कारवाई

सोलापूर शहरातील जोडभावी पेठ, जेलरोड, आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, नितीन विठ्ठल भोसले, वय २८ वर्षे, रा. २७/३ रविवार पेठ, जोशी गल्ली, सोलापूर हा मागील काही वर्षापासुन सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन बेकयदेशीर दगडफेक, खंडणी मागणे, जबरी चोरी, ईच्छापुर्वक शस्त्रानीशी दुखापत करणे, गैरपरिरोध करणे व घातक शस्त्रानीशी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण ०३ गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. नितीन विठ्ठल भोसले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर
शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचे विरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना
माहीती देत नाहीत,
नितीन विठ्ठल भोसले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२४ मध्ये क. ११० (ई) (ग) फौ.प्र.सं अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, मा.एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांनी, दि.१६/०५/२०२४ रोजी त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही, मा. एम. राज कुमार, मा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, मा.डॉ. दीपाली काळे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), मा. विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, अशोक शा. तोरडमल, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०१, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, सुहास चव्हाण, वपोनि, जोडभावी पेठ पोलीस ठाणे, पोउपनि/विशेंद्रसिंग बायस गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी केली आहे.