देश - विदेशराजकीय
ब्रेकिंग! मोठा राजकीय भूकंप
- आगामी विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच झारखंड राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाच्या तीन आमदारांना घेऊन तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. आज दुपारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात चंपई सोरेन भाजपात प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.
- चंपई यांच्या या खेळीने राज्यातील राजकारण तापले आहे. दशरथ गगराई, रामदास सोरेन, चमरा लिंडा, लोबिन हेमब्रोम, समीरम मोहंती हे काही नेते नॉट रिचेबल झाले आहेत. म्हणजेच एकूण सहा आमदारांशी संपर्क बंद झाला आहे.
चंपई सोरेन सध्या भाजपाच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपासूनच राज्याच्या राजकारणात चंपई मोठा राजकीय निर्णय घेऊ शकतात, अशा चर्चा होत्या. आता या चर्चा खऱ्या ठरताना दिसत आहेत. - चंपई यांनी कालच आपल्या वाहनांच्या ताफ्याला जमशेदपूर सर्किट हाऊस येथ सोडले होते. पुढे त्यांनी कोलकाता गाठले. तेथून पुढे दिल्लीला रवाना झाले. फक्त दोन वाहने सोबत घेत सोरेन दिल्लीला रवाना झाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंपई यांनी भाजपाचा रस्ता धरल्यास हेमंत सोरेन आणि इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का असेल.