ब्रेकिंग! वर्ल्ड कप फायनलला शमीवर बंदी
क्रिकेट वर्ल्ड कपचा फायनल सामना रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. या वर्ल्डकप स्पर्धेत भारताने सर्वच सामने जिंकले आहेत. आता भारतीय संघ वर्ल्डकप उंचावण्यासाठी आतुर झाला आहे. भारताचे सगळेच खेळाडू फार्मात आहेत. विशेषतः रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, बुमराह यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात ती मीडियाचा विजय निश्चित आहे, असा आत्मविश्वास भारतीय क्रीडा रसिकांना आहे. दरम्यान आता आता रविवारी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडताना दिसेल. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. फायनल सामन्यापूर्वी शमीवर बंदी घातली गेली आहे. मात्र, घाबरण्याची गरज नाही. कारण, ज्याप्रकारची ही बंदी समजली जात आहे, त्याप्रकारचा हा विषय नाही. विषय वेगळाच आहे. आता प्रत्येकजण याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की, नेमकी ही कसली बंदी आहे. चला तर, याविषयी जाणून घेऊयात… खरं तर, सोशल मीडियावर एक ट्वीट व्हायरल होत आहे. हे ट्वीट डिंडा अकादमी नावाने असलेल्या एका मीम्स अकाऊंटने टाकले आहे. यामध्ये लिहिले आहे की, शमीवर डिंडा अकादमीतून कायमची बंदी घातली गेली आहे. खरे तर, डिंडा अकादमीचे नाव टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अशोक डिंडा याच्या नावावरून ठेवले आहे. जेव्हाही कोणता गोलंदाज आपल्या षटकात सर्वाधिक बळी घेतो, तेव्हा चाहते सोशल मीडियावर त्या गोलंदाजाचे नाव अशोक डिंडा अकादमीसोबत जोडून त्याची थट्टा उडवतात. आता शमीच्या प्रदर्शनानंतर हे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे.