भर रस्त्यात मुलीला मारहाण…

दिल्लीच्या मंगोलपुरी भागात एका मुलीला भर रस्त्यात मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत 2 तरुण एका मुलीला मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये बसवताना दिसून येत आहेत. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, कारवर हरियाणाची नंबर प्लेट होती. तसेच ती प्रायव्हेट कॅब होती. व्हिडिओच्या मदतीने पोलिस या तरुणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजवरून ही कॅब शेवटच्यावेळी गुरुग्रामच्या इफ्को चौकाजवळ शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास दिसून आली.
रोहिणीहून विकासपुरीसाठी बुक केली होती कॅब
पोलिसांच्या माहितीनुसार, व्हिडिओत दिसणाऱ्या 3 जणांनी रोहिणीहून विकासपुरीसाठी उबेर अॅपवरून एक कॅब बूक केली होती. ही कॅब शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास गुरुग्रामच्या इफ्को चौकालगत शेवटची दिसली होती. रस्त्यात तिन्ही प्रवाशांत कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला आणि त्याचे पर्यावसाण मारहाणीत झाले.
त्यानंतर एका तरुणाने मुलीला फरफटत नेत कारमध्ये बसवले. त्यानंतर तिला लाथाबुक्क्याही मारल्या. त्यानतंर तिन्ही प्रवाशी कुठे उतरले हे समजले नाही.
कुणीही केली नाही मुलीची मदत
व्हिडिओ तयार करणारा व्यक्ती ट्रॅफिकमध्ये अडकला होता. त्यावेळी ही घटना निदर्शनास पडल्याने त्याने ती आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. कॅब चालकच नव्हे तर रस्त्यावरील इतर कुणीही पीडित मुलीला मदत केली नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी स्वतःहून त्याची दखल घेऊन चौकशी सुरू केली. आता कॅब मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक गुरुग्रामला गेले आहे.