सोलापूर बातमीखेळदेश - विदेशमहाराष्ट्र

भारतीयांसाठी महाराष्ट्र विशेषता सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद…

आंतरराष्ट्रीय कराटे कॉमनवेल्थ मध्ये आर्या यादवने मिळविले सिल्वर मेडल
११ वी कॉमन वेल्थ कराटे चॅम्पियनशिप साऊथ आफ्रिका दर्बन येथे २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत ही चॅम्पियनशिप सुरू आहे या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये ३९ देशांचा समावेश आहे यात भारताकडून ५३ किलो वजनपर्यंत असलेल्या स्पर्धकांमध्ये सोलापूरची सिंघम कन्या कुमारी आर्या साईनाथ (अतुल ) यादव हिने सिल्वर मेडल पटकावले आहे ही भारतीयांसाठी महाराष्ट्रासाठी विशेषता सोलापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे
यासाठी गेली सहा महिने तिला या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ मध्ये प्रवेश मिळावा म्हणून सर्वांनीच मेहनत घेतली विशेषता तिच्या आई व वडिलांनी प्रचंड मेहनत घेतली त्याचीच फलश्रुती म्हणून हे यश तिला मिळाले तसेच सोलापुरातील मान्यवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अक्कलकोट अन्नछत्र,चेतन भाऊ नरोटे, विनोद दादा भोसले, दत्ता सुरवसे यांनी विशेष सहकार्य केले आर्याने प्रचंड इच्छाशक्ती व मेहनतीने जिद्दीने तिने आज हे यश मिळवले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel