महाराष्ट्रराजकीय

मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला कट मारणे चांगलेच भोवले, भुसे यांनी पाठलाग करत या वाहनाला थांबवले…

मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला कट मारणे चांगलेच भोवले. कारण भुसे यांनी पाठलाग करत या वाहनाला थांबवले. तेव्हा त्यातून अवैध गौवंश वाहतूक सुरू असल्याचे समोर आले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

दादा भुसे मालेगावर दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

मंत्री होते दौऱ्यावर…

मालेगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून तस्करांचा सुळसुळाट सुरू आहे. विशेषतः रात्री-अपरात्री अवैध वाळू वाहतूक, लाकूड वाहतूक, गोवंश वाहतूक सुरू असते. याचा प्रत्यत दिवसाढवळ्या नाशिकचे पालकमंत्री आणि बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे यांना आला. त्याचे झाले असे की, भुसे हे मालेगाव ग्रामीणच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या ताफ्याला सुसाट जाणाऱ्या पिकअप वाहनाने कट मारला. हे कट मारण्याचे त्याला भोवले.

सिनेस्टाइल पाठलाग…

चालकाचे गाडीवर नियंत्रण होते. त्यामुळे काही दुर्घटना घडली नाही. मात्र, दादा भुसे यांनी कट मारणाऱ्या वाहनाचा पाठलाग करण्याच्या सूचना चालकाला दिल्या. चित्रपटाला शोभेलसा असा हा प्रसंग होता. चालकाने त्या वाहनाला गाठले. तेव्हा आधी भुसे यांनी चालकाचा आपल्या रांगड्या बोलीत समाचार घेतले. तेव्हा त्याची भीतीने चांगलीच गाळण उडाली.

वाहनाची तपासणी केली…

भुसे यांनी चालकाला फैलावर घेतले. त्यानंतर सोबतच्या अधिकाऱ्यांना या वाहनाची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. तेव्हा गाडीत अवैध पद्धतीने गोवंशची वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले. तेव्हा भुसे यांनी पोलिसांना बोलावत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. गेल्या अनेक दिवसांपासून मालेगाव तालुक्यात वाळू तस्करी, गोवंश तस्करी सुरू आहे. तस्करांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel