सोलापूर बातमीसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

सोलापूर चे पालकमंत्री मा.ना जयकुमारजी गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी…!

सोलापूर
आज शुक्रवार रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री,तथा सोलापुरचे पालकमंत्री मा.ना. जयकुमारजी गोरेसो यांच्या बरोबर सोलापुर विकास मंच च्या शिष्टमंडळ बरोबर जिल्हा नियोजन इमारती मधील पालकमंत्री यांच्या कक्ष मध्ये सविस्तर प्रदीर्घ बैठक झाली, वैशिष्ट्य म्हणजे यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी मा. कुमार आशिर्वादसो व जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा कुलदीप जंगमसो, अक्कलकोट चे आमदार मा सचिन कल्याणशेट्टी व मध्य सोलापूर चे आमदार देवेंद्र कोठे ,माढ्याचे आमदार अभिजीत पाटील उपस्थित होते .
सदर बैठकीत सोलापूर विकास म़ंच चे सदस्य इंजि मिलिंद भोसले ,केतन शहा ,योगीन गुर्जर यांनी तीन विषय बैठकीत प्रखरपणे मांडले .
त्या बैठकीमधील प्रश्न त्यांचे‌ बैठकीत झालेली चर्चा खालीलप्रमाणे

प्रश्न १: सोलापूर मधील होटगीरोड येथुन विमानसेवा २६ मे २५ ला सुरू होणार होती ,परंतु अद्यापही याबाबत काहीही हालचाल दिसुन येत नाही , या कारणांमुळे सोलापूर विकास मंच २६ मे रोजी विमानतळास कुलुप लावुन आंदोलन करणार आहोत अशी शिष्टमंडळ ची मागणी!

पालकमंत्री महोदय यांचे उत्तर : माझे मुख्यमंत्री यांच्या बरोबर या विषयावर चर्चा /बोलणे झाले आहे, तसेच जेवढ्या शक्य आहे तेवढे लवकर आपण नागरी विमानसेवा सुरु करीत आहोत,त्याच वेळी त्याच ठिकाणी केतनभाई शहा यांनी FLY 91 चे चेयरमन CEO श्री मनेजजी चाको यांच्या बरोबर पालकमंत्री यांची फोनवर बोलणे करुन दिले.
ही सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली . श्री चाके यांनी गोवा सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू करीत आहोत असे उत्तर दिले .तसेच पालकमंत्री यांनी मुंबई साठी तातडीने प्रयत्न करावे हे महत्त्वाचे असे सांगितले .एकंदरीत सविस्तर शिष्टमंडळ बरोबर चर्चा झाली त्यानुसार विमानसेवा सुरू ही २६ में च्या पुढे थोडे जाईल पण नक्की विमानसेवा सुरू होईल ,तसेच २६ मे तारीख कुणी जाहीर केली याबाबत मला माहिती नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले, तसेच आपण लोकशाही मार्गाने व बुद्धिजीवी वर्ग आहे आपण कृपया २६ में ला आंदोलन करू नये यामुळेच आपल्याच जिल्हाचे नाव खराब होते ,तसेच आपण कृपया आंदोलन करू नये. आपणही यासाठी भरपूर प्रयत्न करीत आहात हे आम्हाला सर्वांना माहिती आहे यासाठी थोडे‌ वाट पहा आपण दोघै मिळुन यातून मार्ग काढु असे सांगितले

दुसरा प्रश्न : सोलापूर साठी छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोरेगाव ५४ मीटर रस्ता चे काम कधी संपणार आहे ?

तिसरा प्रश्न : सोलापूर विजापूर रस्ता वरील अतिक्रमण काढण्याची मोहीम कोणत्याही प्रकारची कोर्टाची कागदपत्रे नसताना का थांबविले ?

पालकमंत्री महोदय : दोन्ही विषय अत्यंत गंभीर दखल घेण्यासारखे आहेत ,तातडीने आमच्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांच्या कडे त्यांनी दिली व त्यांना आदेश दिला की दोन चार दिवसात सोलापूर महापालिका आयुक्त यांच्या बरोबर माझी या विषयावर संबंधित शिष्टमंडळा समेवत बैठक आयोजित करावी .

अशा आपल्या मागण्या. संदर्भात सकारात्मक गोष्टी सदर पालकमंत्री महोदय यांच्याबरोबर विकास मंच शिष्टमंडळ झालेल्या प्रदीर्घ बैठकीत झाल्या असल्या कारणाने व तसेच पालकमंत्री यांनी आपण कृपया २६ मे रोजी आंदोलन करू नये असे आवाहन सगळ्या वरिष्ठ अधिकारी व मा आमदार महोदय समोर‌ केले या सर्वांचा मान राखत सोलापूर विकास मंच सदर २६ में चे आंदोलन संस्थगित करीत आहे अशी माहिती सोलापूर विकास मंच चे मिलिंदजी भोसले,केतनजी शहा,योगीनजी गुर्जर यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia