railwayदेश - विदेशमहाराष्ट्रसोलापूर बातमी

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात राजभाषा सप्ताहाचे आयोजन….

मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालय,सोलापुर मध्ये दिनांक 16.09.2024 ते 20.09.2024 या कालावधीत राजभाषा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राजभाषा विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध शाखांमध्ये दिनांक 16.09.2024 आणि 17.09.2024 रोजी टेबल प्रशिक्षण दिले आणि दिनांक 18.09.2024 रोजी कंप्यूटर प्रयोगकर्ताना हिंदी टाइपिंग आणि व्हॉईस टायपिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.

दिनांक 19.09.2024 रोजी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक व अतिरिक्त मुख्य राजभाषा अधिकारी श्री अंशुमाली कुमार यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी दिन सोहळ्याचे आयोजन आणि विभागीय राजभाषा कार्यान्वयन समिती, सोलापूरची त्रैमासिक बैठक आणि महाव्यवस्थापकांचा ‘हिंदी दिन संदेश’चे वाचन आणि राजभाषा त्रैमासिक ‘संदेश’ सूचनापत्राचे विमोचन करण्यात आले. ह्या सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, सरकारी कामकाजात राजभाषा हिंदीचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा, राजभाषेशी संबंधित विषयाचे ही निरीक्षण करण्यात यावी व त्याचा उल्लेख निरीक्षण रिपोर्ट मध्ये करण्यात यावा. फाईलवर किंवा पत्रावर रिमार्क फक्त हिंदी मध्येच द्याव्यात.

यावेळी विभागीय स्तरावर आयोजित हिंदी निबंध, वकृत्व आणि मसुदा लेखन स्पर्धेतील यशस्वी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक व अतिरिक्त मुख्य राजभाषा अधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

ह्या बैठकीला सर्व शाखाधिकारी, अधिकारी, मुख्य कार्यालय अधीक्षक/कार्यालय अधीक्षक आणि स्टेशन राजभाषा कार्यान्वयन समितीचे अध्यक्ष/सदस्य-सचिव उपस्थित होते. या बैठकीचे सूत्र संचालन सहायक कार्मिक अधिकारी आणि संपर्क राजभाषा अधिकारी श्री एस.एल. खोत यांनी केले. ही सभा यशस्वी करण्यासाठी राजभाषा विभागाचे श्री व्ही.बी. काडगे, श्री. मुश्ताक शेख, श्री. शिवसाहेब यादव, श्री. किरण माने यांनी आपले मोलाचे योगदान दिले. दिनांक 20.09.2024 रोजी कर्मचाऱ्यांसाठी राजभाषा प्रश्नावली आयोजित केली जाईल आणि राजभाषा सप्ताहाची सांगता करण्यात येईल.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel