railwayमहाराष्ट्रसोलापूर बातमी

मध्य रेल्वे च्या सोलापूर विभागात अंतर विभागीय श्वान प्रतियोगिता संपन्न….

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने १२ आणि १३ सप्टेंबर २०२४ रोजी अंतर विभागीय श्वान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मध्य रेल्वेच्या सोलापूर, मुंबई, भुसावळ, पुणे आणि नागपूर या पाच विभागांतील प्रत्येकी दोन श्वानांनी सहभाग घेतला.

सोलापूर विभागातील रेल्वे सुरक्षा बलाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत तीन प्रकारांच्या स्पर्धांचा समावेश होता, त्यामध्ये ट्रॅकर, एक्सप्लोसिव्ह आणि नार्कोटिक्स या प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे होते:

ट्रॅकर आणि एक्सप्लोसिव्ह प्रकारांमध्ये नागपूर रेल्वे विभागातील ‘रॅव’ आणि ‘रिओ’ या श्वानांनी ४०० गुणांपैकी अनुक्रमे ३१० आणि ३७१ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. मुंबई रेल्वे विभागातील ‘सिम्बा’ या श्वानाने नार्कोटिक्स प्रकारात ४२५ गुणांपैकी ३९३ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

ट्रॅकर आणि एक्सप्लोसिव्ह प्रकारांमध्ये मुंबई रेल्वे विभागातील ‘हॅप्पी’ आणि ‘जिमी’ या श्वानांनी ४०० गुणांपैकी अनुक्रमे ३०१ आणि ३४८ गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला. नागपूर विभागातील ‘प्रिन्स’ या श्वानाने नार्कोटिक्स प्रकारात ४२५ गुणांपैकी २८२ गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला.

सदरच्या स्पर्धेत बेल्जियन शेफर्ड या प्रजातीचा श्वान मुख्य आकर्षण ठरला. याशिवाय डॉबरमॅन आणि लॅब्राडोर अशा प्रजातींचा देखील सहभाग होता. या स्पर्धेचे परीक्षण के-९ स्कूल, पुणे येथील आर.पी.एफ. निरीक्षक श्री. संदीप पवार आणि सहाय्यक उपनिरीक्षक श्री. दीपक भोसले यांनी केले तर पारितोषिक वितरण सहायक सुरक्षा आयुक्त श्री दिनेश कनोजिया यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यामध्ये वरील विजेते श्वान, हाताळणारे श्री. नितीन नाईक, जगदीश प्रसाद सोनी नागपूर आणि श्री योगेश घुगे मुंबई आणि सहाय्यक. हस्तकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

रेल्वेच्या सुरक्षेत श्वानांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रेल्वेतील गैरप्रकार रोखणे, घातपाताच्या शक्यता ओळखणे, आणि संभाव्य घातपाताचा शोध घेऊन तो हाणून पाडणे या उद्देशाने श्वानांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel