‘मविआ’च्या बैठकीत लोकसभा, विधानसभा जागा वाटपांबाबत चर्चा
महाविकास आघाडीची मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकला बैठक नुकतीच झाली. या बैठकीला तिन्ही पक्षाचे मुख्य नेते उपस्थित होते. बैठकीनंतर मविआतर्फे संजय राऊत, नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी एकत्रित पत्रकार परिषद झाली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजय, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप यावर या बैठकीत चर्चा झाली.
निवडणुका आणि कोर्टाच्या निर्णयावर चर्चा
जयंत पाटील म्हणाले, आजच्या बैठकीत निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. मविआ म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निकालावर साधक बाधक चर्चा बैठकीवर झाली. पुढे कोणत्या गोष्टी होण्याची शक्यता आहे याची चर्चा झाली. अध्यक्षांवर सुप्रीम कोर्टाने जबाबदारी दिली याचाही आढावा घेतल्या आहेत. उन्हाळ्यामुळे मविआच्या बैठका पुढे ढकलल्या. जूनचा पाऊस पाहता आम्ही या बैठका सुरू करणार आहोत. मविआच्या सभाही पाऊस आणि ऊन पाहुन थांबवल्या त्या पुन्हा आम्ही अंदाज घेवून सुरू करू.
कर्नाटकचे यश डोळ्यासमोर ठेवणार
जयंत पाटील म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा जागा वाटपांबद्दल मविआचे घटक पक्ष आणि राज्यातील इतर पक्ष यांना बोलावून चर्चा करणार आहोत. मविआला सक्षम करण्याचे प्रयत्न होत आहे. यावरच आमच्या सर्व नेत्यांचे एकमत झाले आहे. कर्नाटकसारखेच यश मिळवण्यासाठी मविआ राज्यात प्रयत्न करणार आहे.
आम्हाला मोठा आनंद
जयंत पाटील म्हणाले, कर्नाटकातील यश काॅंग्रेससाठी मोठे आहे. भाजप पराभूत झाला त्यामुळे आम्हालाही बळ मिळाले आणि आनंद झाला आहे. तेथील निकालाचा आम्ही आढावा आजच्या बैठकीत घेतला आहे.
यावर होणार चर्चा
आज होणाऱ्या बैठकीमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसने अभुतपूर्व विजय मिळवला. काँग्रेसच्या या विजयाने विरोधकांच्या आशा आणखीनच पल्लवीत झाल्या आहेत. पुढील वर्षी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका एकत्र लढण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीचा विचार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये जागा वाटपांबद्दल प्राथमिक चर्चा झाली.