महिला मुख्यमंत्री कधी होणार याची महाराष्ट्र वाट पाहतोय – नरसय्या आडम
शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीने शारदाई सन्मान सोहळ्यात कर्तुत्ववान महिलांचा झाला सन्मान...
महाराष्ट्र हा जितका छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचा आहे तितकाच जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर यांचाही आहे. त्यामुळे महिला मुख्यमंत्री कधी होणार याची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे असे प्रतिपादन माजी आमदार नरसय्या आडम यांनी केले.
संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरच्या शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान आठ महिलांचा शारदाई सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. निर्मलकुमार फडकुले सभागृहात माजी आमदार नरसय्या आडम यांचा हस्ते, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते आणि प्रतिष्ठानचे निमंत्रक महेश गादेकर, मनोहर सपाटे, भारत जाधव, शंकर पाटील, नलिनी चंदिले, सुनिता रोटे, प्रतीक्षा चव्हाण, लता फुटाणे, विलास लोकरे, राम साठे, गोवर्धन सुंचू, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बाबर, सचिव दीपक राजगे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना नरसय्या आडम यांनी पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगितले. महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे. देशात 50 टक्के महिला आहेत मात्र त्यांचा विचार करण्यात येत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गोदुताई परुळेकर नगर याला शरद पवार यांनी कशी मदत केली हे सांगताना शरद पवार यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
अध्यक्षीय भाषणात प्रकाश यलगुलवार यांनी शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले. महिलांचे कार्य कर्तुत्व समाजासमोर येणे गरजेचे आहे. त्या कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम पवार साहेबांनी नेहमी केले आहे. खासदार सुप्रिया सुळे या अपंग, मूकबधिर क्षेत्रातही चांगले काम करतात. नॅब संस्थेलाही त्या कायम मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
महेश गादेकर यांनी आपल्या भाषणात उपस्थित महिलांच्या कर्तुत्वाचा गौरव केला. पवार साहेबांनी प्रत्येक क्षेत्रात महिलांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले. महिला आरक्षण दिलं. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सन्मान केलेल्या महिलांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बाबर यांनी प्रास्ताविक करताना हा उपक्रम राबविण्या मागील उद्देश स्पष्ट केला.
यावेळी समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास सिद्धार्थ सर्वगोड, अबूबकर सय्यद, शंतनू साळुंखे, निलेश धोत्रे, सिद्धलिंग म्हेत्रे, डॉ. बाबासाहेब सुलतानपुरे, सुनील माने, तम्मा पोतदार, संजय जाबा, बिराप्पा बंडगर, लखन गावडे, सिद्धारूढ निंबाळे, मिलिंद गोरे, मुसा अत्तार, विपुल केसकर, दीपक माने, ओंकार राजगे, अमित मोतेमवार आदिंसह नागरिक, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केलं तर आभार चंद्रकांत पवार यांनी मानले.
………………………………….
…..यांचा झाला सन्मान
माढ्याच्या नगराध्यक्ष ॲड. मीनल साठे, मंगळवेढ्याच्या उद्योजिका डॉ. राजलक्ष्मी गायकवाड, आहार तज्ञ डॉ. सोनाली घोंगडे, वालचंद महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ विजया महाजन, चार्टर्ड अकाउंटंट डॉ. नेहा भट्टड, माजी नगरसेविका कॉम्रेड नसीमा शेख, प्राची महिला बचत गटाच्या नीता गवळी, योगशिक्षिका अनिता कोडमूर या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल शारदाई पुरस्काराने सन्मान करण्यात आला.