माळशिरस तालुक्यातील अनुसूचित जातींचे हक्क आणि अधिकारांचे संरक्षण करत असताना आम्ही आमचे रक्त सांडू – लालासाहेब अडगळे
माळशिरस तालुक्यातील अनुसूचित जातींचे हक्क आणि अधिकारांचे संरक्षण करत असताना आम्ही आमचे रक्त सांडू असे आवाहनच अकलूज येथील सामाजिक चळवळीतील अग्रगण्य कार्यकर्ते लालासाहेब अडगळे यांनी दिले,माळशिरस तालुका हा अनुसूचित जाती साठी राखीव असल्या कारणाने येथे अनुसूचित जाती च्या कार्यकर्त्याने निवडणुक लढवली पाहिजे,असे आव्हाहन हि लालासाहेब अडगळे यांनी दिले…
माळशिरस तालुक्यातील सद्य परिस्थितीचा आढावा घेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती बद्दल त्यांच्या भावना काय आहेत याचा संदर्भ दिला तो खालील प्रमाणे असा…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ९ मार्च १९२४ला मुंबई दामोदर हॉल येथील सभेत व्यक्त केलेल्या भावना अशा ते म्हणाले,” मी मिळविलेल्या ज्ञांनशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात यासाठी करणार नाही.मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे.त्या साठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत.त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाजांना यांचा फायदा होईल.अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत.ते सर्व मी सोडवू शकणार नाही,याची मला जाणीव आहे.परंतु ते सर्व प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधू शकेन,एवढा मला आत्मविश्वास आहे.अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे.या हिमालयाशी टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे.हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तबंबाळ डोके पाहून सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील,हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा. आपापसात जर अशी तेढ पिकवीत राहिलात तर मग मलाच काय,पण प्रत्यक्ष परमेश्वरालाही याबाबतीत काहीही करता येणार नाही…
पुढे बोलताना लालासाहेब अडगळे असे हि म्हणाले की,याचा विचार माळशिरस तालुक्यातील नेतेमंडळींना करावा लागेल.जे हक्क आणि अधिकार संविधानात आम्हाला दिले आहेत.त्या सर्व हक्क आणि अधिकार यांचे संरक्षण करणे आमचे आद्यकर्तव्य आहे.गेली पंधरा वर्षे झाली माळशिरस तालुका हा अनुसूचित जाती साठी राखीव झालेला असताना संख्येने मोठे असणारे अनुसूचित जाती मधिल समाजांना जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलेले आहेच परंतु अनुसूचित जातींचे बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे जातींचे दाखले काढून संविधानाला छेद करणार्या प्रवृत्ती या माळशिरस तालुक्यात जन्माला घालून राजरोसपणे अनुसूचित जातींचे हक्क आणि अधिकार आशा जात चोरांच्या घशात राजकिय हव्यासापोटी जाणार असतील तर पिढ्यानपिढ्या दारिद्र्य भोगणाऱ्या अनुसूचित जातींन वरती होत असलेल्या या अन्याय विरुद्ध वेळ पडली तर आम्ही आमचे रक्त सांडून आमचे हक्क व अधिकार वाचवू परंतु आमच्या हक्क आणि अधिकार यांचे हिस्सेदार आम्ही कोणालाही होऊ देणार नाही.देश स्वतंत्र होऊन ७८ वर्षे लोटली परंतु खरा लाभार्थी आणखी हि वंचित राहिलेला आहे.हे या माळशिरस तालुक्यातील मायबाप जनतेला माहित आहे.येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जबरदस्तीने एखाद्याला जनतेवर लादण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आम्ही तो सहन करणार नाही.हा सर्वं डाव आम्ही हाणून पाडल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही…