देश - विदेश

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन…

ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. 63 व्या अखेरचा श्वास घेतला. महाडेश्वर यांना मंगळवारी पहाटे दोन वाजता हृदयविकाराचा झटका आला. महाडेश्वर यांच्या आकस्मिक निधनामुळे ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे. त्यांनी 2017 ते 2019 मध्ये मुंबईचे महापौर देखील होते.

आज दुपारी 2 वाजता वांद्रे येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार असून 4 वाजता अंत्ययात्रा निघेल. दुपारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अंत्यदर्शनाला जाणार आहेत.

विश्वनाथ महाडेश्वर यांचे नातेवाईक परशुराम तानावडे यांनी सांगितले की, आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यांची मुलगी रात्री लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेली असता तिने वडील बेशुद्ध पडलेले पाहिले, त्यानंतर त्यांना व्हीएन देसाई रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

राजकीय प्रवास

विश्वनाथ महाडेश्वर यांचा जन्म 15 एप्रिल 1960 रोजी झाला होता. त्यांनी मुंबईतील रुईया महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले होते. तसेच ते सांताक्रूझमधील राजे संभाजी विद्यालयाचे माजी प्राचार्य होते. त्यानंतर त्यांनी ​​राजकारणात प्रवेश केला. ​​​​​

2002 – मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले 2003- शिक्षण समितीचे अध्यक्ष

2007 – पुन्हा नगरसेवक म्हणून निवड

2012- तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवड

मार्च 2017 ते नोव्हेंबर 2019 – महापौर म्हणून निवडून आले

मुंबईतील सर्वात उच्चशिक्षित नगरसेवकांपैकी एक अशी त्यांची ओळख होती

सोमय्या मारहाण प्रकरणी अटक

भाजप नेते किरीट सोमय्या मारहान प्रकरणी विश्वनाथ महाडेश्वरांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी शिवसेनेने सोपवली होती.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel