सोलापूर राजकीय

मुंबई आझाद मैदानावर AIMIM पक्षाकडून मराठा बांधवांना मदत

मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी जमलेल्या मराठा बांधवांना AIMIM पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष हाजी फारुकभाई शाब्दि व त्यांच्या टीमच्या वतीने आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आझाद मैदानावर एकवटला आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाला न जुमानता मराठा बांधवांनी आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी ऐतिहासिक एकजूट दाखवली आहे.

सरकारने वेळोवेळी मराठा समाजाशी केलेली फसवणूक आणि दिलेले आरक्षण पुढे स्थगित करण्याच्या वृत्तीमुळे समाजामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज दादा जरांगे पाटील यांनी “करो या मरो” या भूमिकेतून आझाद मैदानावर लाखो मराठा बांधवांसोबत आंदोलन सुरू केले आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येतील आंदोलनकर्त्यांसाठी सरकारकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. जेवण, पाणी, निवारा अशा अनेक मूलभूत गरजांसाठी प्रश्न निर्माण झाले आहेत.

या परिस्थितीची दखल घेऊन AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी प्रदेश कार्याध्यक्ष हाजी फारुक शाब्दी यांना तातडीने मदतीचे आदेश दिले. आदेशानुसार फारुकभाई शाब्दी व त्यांच्या टीमकडून आझाद मैदानावर जमलेल्या मराठा बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तू, पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच, पुढील काळात मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अडचण निर्माण झाल्यास AIMIM पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही देण्यात आली.

AIMIM पक्ष फक्त मुस्लिम समाजासाठीच नव्हे तर सर्व जाती-धर्मांसाठी समानतेने काम करतो आणि पुढेही करत राहील. आवश्यकता भासल्यास AIMIM पक्ष मराठा समाजासोबत रस्त्यावर उतरून आंदोलनातही सामील होईल, असे आश्वासन हाजी फारुक शाब्दी यांनी दिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel