सोलापूर महानगरपालिका

सोलापुरात सीना नदीला महापूर – गावोगावी पाणी शिरल्याने नागरिक हवालदिल…

सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर; तिर्हे गावासह अनेक घरांमध्ये पाणी शिरले, नागरिकांचा आक्रोश

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला महापूर आला आहे. नदीच्या काठावर व आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तिर्हे गावात लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील अन्नधान्य, वस्तू, कपडे, तसेच लग्न-उत्सवाचे साहित्य पाण्यात भिजल्याने नागरिक हतबल झाले आहेत.

गावातील नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना सांगितले की, “पाऊस आणि पुरामुळे आमचं जगणं कठीण झालं आहे. घरं पाण्यात गेली आहेत, कुठलीच मदत मिळालेली नाही. आमदार-खासदार एकदाही विचारपूस करायला आले नाहीत. संकटाच्या काळात आम्हाला कोणी आधार द्यायला तयार नाही.”

महापुरामुळे परिसरातील जनजीवन ठप्प झाले असून गावकऱ्यांचा आक्रोश वाढत चालला आहे. लोकांनी प्रशासन आणि शासनाकडे तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia