सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर अपघातसोलापूर क्राईम

नई जिंदगीतील-चंद्रकला नगरात बाईकचा थरार ; तरुणाचा पाय फ्रॅक्चर, दात पडले!

सोलापूर –  चंद्रकला नगर परिसरात भरधाव वेगात आणि हयगयीनं बाईक चालवणाऱ्या मुजोर चालकाने एका तरुणाला विरुद्ध दिशेने येऊन जोरात धडक दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे..

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८७२/२०२६ भा.न्या.संहिता कलम २८१, १२५(अ)(ब), १८४, १७७ प्रमाणे अज्ञात बाईक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना – दि. २५/०९/२०२६ रोजी रात्री ७.०० वा. चे सुमारास, चंद्रकला नगर, सोलापूर
तक्रार – दि. ३०/०९/२०२६ रोजी रात्री ९.४५ वा.

फिर्यादी – फिरोज गुलचंद मुल्ला, रा. १२ चंद्रकला नगर, सोलापूर
आरोपी – मो. सायकल क्र. MH १३ DN ३३५८ चा अज्ञात चालक

हकीकत अशी की, आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने, निष्काळजीपणे आणि हयगयीनं चालवून फिर्यादीचा मुलगा मेहफज यास विरुद्ध दिशेने येऊन जोराची धडक दिली. या धडकेत मेहफजच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, तोंडाच्या आतील वरच्या बाजूला मार लागून त्याचा दातच पडला आहे.

अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून, एमआयडीसी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पोहे.कॉ. ५१२ गायकवाड हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel