मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी पद नको – डीके शिवकुमार
सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला आहे, मात्र डीके शिवकुमार यांना हा निर्णय मान्य नाही. मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी पद नको, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
ते लोकसभेच्या 20 ते 22 जागा जिंकून देऊ शकतात, असेही त्यांनी हायकमांडला सांगितले आहे. सोनिया आणि राहुल गांधींनंतर आता प्रियांका गांधींवर डीके यांना मनवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. वन टू वन बोलण्यासाठी त्या संध्याकाळी डीके यांची भेट घेतील. या सगळ्यात बंगळुरूमध्ये शपथविधीची तयारी थांबवण्यात आली आहे.
यापूर्वी डीके म्हणाले होते की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री बनवल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू असल्याचे कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. निर्णय होताच आम्ही जाहीर करू. दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ स्थापन होईल. पण शपथविधीची तयारी बंगळुरूच्या कांतीरवा स्टेडियममध्ये सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री पदाबाबत गेल्या चार दिवसांपासून बंगळुरू ते दिल्लीपर्यंत अनेक बैठका झाल्या. या शर्यतीत सिद्धरामय्या आघाडीवर होते. तत्पूर्वी, रविवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व आमदारांनी खरगे यांना नेता निवडीचे अधिकार दिले होते. यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी निरीक्षकांना सर्व आमदारांशी वन टू वन चर्चा करण्यास सांगितले होते. त्यापैकी 80 हून अधिक आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या बाजूने मतदान केले होते.