राजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर राजकीय
मुस्लिम समाज हा खजूर, इफ्तार पार्टी आणि सरबत पुरता मर्यादित राहिलेला नाही;विधानसभेला जड जाणार…
288 पैकी 40 उमेदवार मुस्लिम समाजाचे पाहिजे...
सोलापूर:आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात सर्वच राजकीय पक्ष हालचाल करू लागले आहेत.राज्य पातळीवर सेक्युलर मुस्लिम फ्रंट ही चळवळ सुरू झाली असून राज्यभर दौरे सुरू केले आहे.या चळवळीचे प्रमुख बॅरिस्टर आफरोज मुल्ला यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले,महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला विधानसभा निवडणुकीत किमान 40 जागा द्यावा,म्हणजेच 15 टक्के मुस्लिम आमदारांनी विधानसभेत प्रवेश करावा.मुस्लिम समाज हा फक्त खजूर,इफ्तार पार्टी पुरता मर्यादित राहिला नाही.लोकसभा निवडणुकीत याच मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला डोक्यावर घेतले होते.मुस्लिम समाजामुळे इंडिया आघाडीला विरोधी पक्षाचा दर्जा मिळाला.अन्यथा हा मुस्लिम समाज पुन्हा एकदा राजकारण्यांना जागा दाखवेल .अशी प्रतिक्रिया बॅरिस्टर आफ्रोज मुल्ला यांनी बोलताना दिली