मुस्लीम महिलांना माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देऊ नका,नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
अशातच आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषतः मुस्लीम महिलांना वगळावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असून राज्य सरकार काय भूमिका घेतयं ? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. प्रमोद महाजन यांनी योजनेच्या अटी शर्तींवर आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ”राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्यातील महिला सक्षम होणार आहेत. परंतु राज्य सरकारने डोमिसाईल प्रमाणपत्राची अट घालणे आवश्यक आहे. अन्यथा राज्याबाहेरील लोक या योजनेचा फायदा घेतील”.
दरम्यान, या योजनेसाठी लाभार्थी महिलांच्या वयाची अट सुरवातीला 60 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली होती. आता ती हटवण्यात आली असून वयोमर्यादा 65 वर्षे इतकी करण्यात आली आहे.
तसेच जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे. तसेच अर्ज भरण्याची मुदत 1 जुलै 2024 पासून सुरू झाली असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत बुधवार (2 जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात घोषणा केली आहे



