सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

“मोहब्बत की किताब ” या पुस्तकाचे होणार प्रकाशन

नामदेवराव भालशंकर गौरव समितीचे पुरस्कार जाहीर

नामदेवराव ( बापू ) भालशंकर गौरव समिती सोलापूर आयोजित नामदेवराव (बापू) बंडूजी भालशंकर यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त प्रज्ञावंत, शीलवंत, गुणवंत मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि मातोश्री रुक्मिणी फाऊंडेशन सोलापूर या ट्रस्टच्यावतीने स्पर्धा परीक्षा देणारे हुशार, होतकरु आणि गरजु तसेच निराधार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप समारंभ आणि सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाऊंडेशनच्या वतीने संविधानदिनी घेण्यात आलेल्या संविधान परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्रांचे वितरण तसेच अभियंता, राज्यकर निरीक्षक
बुध्दजय भालशंकर लिखित भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करणाऱ्या “मोहब्बत की किताब ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता
शिवस्मारक सभागृह नवी पेठ, सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली. पुरस्कार वितरणाचे हे ११ वे वर्ष आहे.

यावर्षीच्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कारासाठी शशिकांत सदानंद जाधव-अध्यक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती ॲन्टॉप हिल मुंबई , भगवान गौतम बुध्द जीवनगौरव पुरस्कारासाठी अंबादास रामचंद्र कदम- जिओसी समता सैनिक दल, सोलापूर , माता रमाई भिमराव आंबेडकर जीवनगौरव पुरस्कारासाठी जयसाबाई अजीनाथ हांडे मु. पो. तांबोळे ता.मोहोळ जि.सोलापूर , कर्मवीर भाऊराव पाटील
जीवनगौरव पुरस्कारासाठी युवराज भगवान सांगळे – अध्यक्ष – विद्या विकास
बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, चुंब ता. बार्शी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत
पत्रकार पुरस्कारासाठी शरीफ चाँदसाब सय्यद- उपसंपादक- दैनिक पुण्यनगरी सोलापूर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत युवती उद्योजिका
पुरस्कारासाठी वृषाली महादेव भुरले – यंत्र कारागिर, श्री ॲटोमोबाईल्स, सोलापूर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवंत युवा उद्योजक पुरस्कारासाठी अमोल सुरेश शिंदे (मालक- अथर्व प्लास्टिक सोलापूर),
महात्मा जोतीबा फुले गुणवंत कामगार सेवक पुरस्कारासाठी
बापूसाहेब रामलिंग सदाफुले अध्यक्ष- सोलापूर महानगरपालिका महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन सोलापूर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कारासाठी प्रतिभा जोतीराम पांडव- सहशिक्षिका, मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगांव, ता.माढा, जि.सोलापूर या सत्कारमुर्तीचा सपत्नीक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ,
शाल, वृक्षाचे रोपटे देवून सत्कार करण्यात येणार आहे.

याच समारंभात मातोश्री रुक्मिणी फाऊंडेशन सोलापूर या ट्रस्टच्यावतीने जिल्हयातील अनाथ, निराधार, गरजु ,हुशार विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा (एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी) देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात येणार आहे.

यावेळी गौरव समितीचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, सचिव बोधिप्रकाश गायकवाड, प्रा. युवराज भोसले, रवी देवकर, उपप्राचार्य प्रकाश शिंदे, निलकंठ शिंगे, मिलिंद भालशंकर, दाऊत आतार, सुशीलचंद्र भालशंकर, आशुतोष तोंडसे, मंजुश्री खंडागळे, सत्यवान पाचकुडवे, प्रा.डॉ.राजदत्त रासोलगीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel