म.बसवेश्वर आय टी आय मध्ये संविधान दिनाचा अमृतमहोत्सव मोठ्या साजरा…
सोलापूरच्या विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भारतीय संविधान दिनाचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात व थाटात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कार्यालय अधीक्षक पी.एस.दराडे,व्ही.व्ही. जेधे,बी.एस.कोंडगुळे व पाहुण्यांच्या हस्ते संस्थेतील संविधान मंदिराचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसमोर संविधानाच्या उद्धेशिकेचे सामुदायिक वाचन करुन जयजयकर करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना व विवेक विचार मंचच्या सहकार्याने झालेल्या कार्यक्रमास जटायु प्रकाशन संस्थेचे प्रमुख श्री.सिद्धाराम पाटील हे उपस्थित होते,त्यांनी आपल्या भाषणात, संविधानातील मौल्यवान मूल्ये जपण्यासाठी सर्व स्तरात संविधानाचे जागर करण्याची आवश्यकता व्यक्त केली.आय टी आय व्यवस्थापन समितिचे सदस्य व ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी प्रास्ताविक केले.संविधान हा सर्वात पवित्र ग्रन्थ असल्याने इतर ग्रंथाप्रमाणे त्याचे पारायण झाले पाहिजे,अपेक्षा व्यक्त करुन दशरथ वडतिले यांनी हे संविधान कुणालाही बदलता येणार नसल्याचे ठामपणे सांगितले. संस्थेचे प्रभारी उपप्राचार्य राजेंद्र आवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास विवेक विचार मंचच्या जिल्हा संयोजिका अश्विनीताई चव्हाण,शहर संयोजक ऍड.प्रशांत कांबळे,कोषाध्यक्ष श्रीधर खेडगीकर तसेच मारुती साळुंके व शशिकांत वाघमारे हे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण पुतळे यांनी केले तर स्मिता शिंदे यांनी आभार मानले.एस.आर. जगझाप यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य एस.आर.भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली गट निदेशक एस.आर.गोलेकर, एन.एस.म्हेत्रे,सी.डी. जाधव तसेच सर्व गट निदेशक व एन.एस.एस.टीमने विशेष परिश्रम घेतले.