सोलापूर बातमीदेश - विदेशमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीय

युवकांच्या पाठिंबामुळेच दक्षिणमध्ये विकास कामे केली: आ.सुभाष देशमुख

दक्षिण सोलापूर तालुका भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर....

समाजाचे प्रश्न सोडविण्याची ताकद फक्त युवकांमध्येच आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील युवकांच्या पाठिंब्यामुळेच मी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मोठी विकासकामे करू शकलो, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले. भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आ. देशमुख बोलत होते. यावेळी दक्षिण सोलापूर तालुका भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अप्पासाहेब मोटे यांनी नवी कार्यकारिणी जाहिर केली.
हेरिटेजमध्ये आयोजित मेळाव्यात आ. सुभाष देशमुख यांचे हस्ते युवा कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. आमदार देशमुख पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी युवा मोर्चाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे.

दक्षिण सोलापूर तालुका भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणीत 4 सरचिटणीस, 1 संघटन सरचिटणीस, 8 उपाध्यक्ष, 9 चिटणीस यांचेसह कार्यालय प्रमुख, कोषाध्यक्ष व 29 कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली.
अध्यक्ष- अप्पासाहेब मोटे (मद्रे), सरचिटणीस- मल्लिनाथ चिवडशेट्टी (होटगी), प्रशांत करजगी (निंबर्गी), अण्णाराव पाटील (कुडल), श्री शशिकांत पाटील (आहेरवाडी), संघटन सरचिटणीस- महेश मळेवाडी (राजूर), उपाध्यक्ष- धनेश कडते (कंदलगाव), राहुल पुजारी (वडकबाळ), शिवराज कालदे (मंद्रूप), शांतकुमार गडदे (औराद), गंगाधर सारवडे (येळेगाव), मल्लिकार्जुन नंदर्गी (लवंगी), बनसिद्ध पट्टेवडियार (हत्तुर), बिळेणसिद्ध पुजारी (शिरवळ)
चिटणीस- प्रविण बिराजदार (भंडारकवठे), श्री महांतेश बिराजदार (टाकळी), प्रेमकुमार बगले (होटगी स्टेशन), अरूण मोकाशी (होनमुर्गी), प्रमोद शिरढोणकर (बरूर), श्रीशैल मलकप्पा कुताटे (कणबस), दादा मेटगार (कारकल), प्रभाकर महादेव आटकर (कुरघोट), संगमेश्वर बिराजदार (हत्तरसंग), कार्यालय प्रमुख- श्रीशैल कुंभार (मंद्रूप), प्रसिध्द प्रमुख- सागर गुळवे (इंगळगी), कोषाध्यक्ष- ओंकार अविनाश पाटील (बोरूळ). कार्यकारिणी सदस्य – आकाश सिताफळे (होटगी स्टेशन), बसवराज प्रचंड (होटगी), संगप्पा शिवण्णा व्हनगोंडे (सिंदखेड), सतीश राजकुमार बिराजदार (यताळ), कल्लाप्पा सोनगे (बरूर), आकाश बसवराज नायकोडे (कणबस), महेश बगले (माळकवठे), सिद्धाराम मल्लिकार्जुन टाकळी (हत्तरसंग), अशोक लक्ष्मण राठोड (कुलकर्णी तांडा), सचिन किसन चव्हाण (कुलकर्णी तांडा), राजकुमार व्हनमाने (वडकबाळ), श्रीमंत राजशेखर ऐवळे (निंबर्गी), सोमनिंग व्हनमाने, स्वप्निल पाटील, रोहित औरसंग (हत्तुर), महेश पुजारी (वडापुर), यल्लाप्पा लक्ष्मण बंडगर (कंदलगाव), जगदीश बिराजदार (संजवाड), राजेश पांढरे (होटगी स्टेशन), शशिकांत पवार (गुंजेगाव), राजशेखर मरेप्पा गिडगोंडे (सादेपूर), सौरभ कस्तुरे (बाळगी), प्रवीण कोरे (औज मंद्रुप), मदाप्पा व्हनमाने (मद्रे ), सुरेश आनंद तांडूरे (बोळकवठे), प्रमोद बबलेश्वर (भंडारकवठे ), शिवराज धर्मराव बिराजदार (निंबर्गी), बाजीगर थोरात (अंत््राोळी), सागर मदन (माळकवठे) खालिद शेख (मनगोळी), किरण बिराजदार (विंचूर), उमेश इसुरे (बोळकवठा), सोशल मिडीयाप्रमुख- सोहम आळ्ळीगिडा (कुसूर),
यावेळी व्यासपीठावर आ. सुभाष देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनिष देशमुख, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष राम जाधव, विधानसभा प्रमुख हणमंत कुलकर्णी, जिल्हा चिटणीस यतीन शहा, उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, उत्तर सोलापूर महिला अघाडी अध्यक्षा वृशाली पवार, संदीप टेळे, जगन्नाथ गायकवाड, प्रभाकर बिराजदार, महेश नरसगोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल गायकवाड यांनी केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel