सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

सोलापूर विद्यापीठाच्या नियतकालिक स्पर्धेत पत्रकार अनिकेत गायकवाड यांना द्वितीय क्रमांक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित नियतकालिक स्पर्धा 2024-25 च्या पारितोषिक वितरण समारंभात नाट्यमय लेखन (मराठी) या प्रकारात वालचंद कॉलेजच्या अनिकेत गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. हा पारितोषिक वितरण समारंभ विद्यापीठाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश तानुबाई आंगणकर महाराज होते. प्रमुख उपस्थिती प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत बसवराज यामा यांची होती, तर प्रमुख पाहुणे म्हणून लोककवी प्रा. प्रशांत मोरे उपस्थित होते.

नाट्यमय लेखन (मराठी) विभागात उल्लेखनीय कामगिरी करत अनिकेत गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. ते वालचंद महाविद्यालय, सोलापूर येथील विद्यार्थी असून एम एस डब्ल्यू द्वितीय वर्षात शिकत आहेत. वालचंद महाविद्यालयाचे “विद्यारायण” हे नियतकालिक दरवर्षी प्रकाशित होते. या नियतकालिकातून लेखनाची संधी मिळाल्यामुळेच ही यशाची पायरी गाठता आली, अशी भावना अनिकेत गायकवाड यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी लेखनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल वालचंद महाविद्यालय तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे आभार मानले. अनिकेत गायकवाड यांच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून शिक्षक व विद्यार्थ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login