क्राईमसोलापूर क्राईम

Solapur breaking – लग्नाच्या 4 दिवस आधीच योगीराज यांचं निधन

सोलापुरातील दुर्दैवी घटना

सोलापूर – (प्रतिनिधि) :- सोलापूर शहरातील अवंती नगर येथील गुलमोहर सोसायटीत राहणारे युवक योगीराज साखरे यांच गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. ते २७ वर्षाचे होते. लग्नाच्या चार दिवस आधीच योगीराज यांचे निधन झाल्याने कुटुंब, नातेवाईक आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

योगीराज यांच्या पार्थिवावर आज सकाळी लिंगायत स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. यावेळी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगीराज हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शैलेश साखरे यांचे ते थोरले चिंरजीव आहेत . येत्या २६ मार्चला योगीराज यांचा विवाह ठरला होता. लग्नपत्रिका वाटण्याचे काम जोरात सुरू होते. तसेच घरात योगीराज यांच्या लग्नाची धामधुम सुरु असताना ही दुःखद घटना झाली. योगीराज यांच्या कुटुंबात अध्यात्मिक वातावरण असून ते औंधकर मठाचे शिष्य होते.त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पडला आहे. हळद लागण्याआधी मुलाचे अंत्यसंस्कार करावे लागल्याने आईने फोडलेला हंबरडा काळीज हेलावून टाकणारा होता.

परिसरात या दुर्दैवी घटनेने मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते.योगीराज यांच्या पश्चात आई-वडील, धाकटा भाऊ असा परिवार आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel