लग्नाला आले नाहीत म्हणून पत्नी आणि मुलांनी संपवले…
नाशिक : नाशिकच्या चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरच्या लग्नाला आले नाहीत म्हणून पत्नी आणि दोन मुलांनी स्वतःच्या वडिलांनाच मारहाण करून संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नाशिकच्या चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंदलगाव आहे. मनमाड आणि मालेगाव या दोन शहरांच्या मध्ये हे कुंदलगाव असून या गावात राहणाऱ्या पूनमचंद शिवाजी पवार यांची पत्नी आणि दोन मुलांनी निर्दयीपणे हत्या केली आहे. पूनमचंद पवार यांच्या पुतणीचा लग्न सोहळा होता. या लग्न सोहळ्यामध्ये पुनमचंद यांची पत्नी सुनीता आणि दोन मुलं भूषण आणि कृष्णा हे उपस्थित होते. पण लग्नामध्ये स्वतः पुनमचंद हे उपस्थित नसल्यामुळे त्यांना सातत्याने, ‘ते का आले नाहीत ?’ अशी विचारणा घरातून होत होती.
दरम्यान पूनमचंद जेव्हा घरी आले तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलांनी त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणी मध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी पुनमचंद यांच्या भावाला ही माहिती दिली. पुनमचंद यांचे भाऊ घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या भावाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ असे सांगितले. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.