न्यायालय निर्णयक्राईममहाराष्ट्रसोलापूर बातमी

लाच घेतल्याप्रकरणी खाजगी इसमास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर…

सोलापूर :- तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्या प्रकरणी भगवान उर्फ भागवत जनार्दन बागल, रा पंढरपूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी जामीन मंजूर केला.

यात हकिकत अशी की, खाजगी इसम भगवान बागल याने तक्रारदारावर असलेली चाप्टर केस लवकरात लवकर काढून टाकतो म्हणून एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, दि 26-3-2024 रोजी पंढरपूर तहसील ऑफिस येथे तक्रारदाराकडून एक हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना भगवान बागल यास साफळा रचून पोलिसांनी रंगेहात पकडले होते, त्यावरून त्याचे विरुद्ध पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
त्यावर भगवान बागल याने पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर भगवान बागल याने ऍड रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस आरोपी/अर्जदाराचे वकील ऍड.रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात अर्जदार/आरोपी हा सरकारी कर्मचारी नाही, गुन्ह्याचा तपास पूर्णत्वात आलेला असल्याने आरोपीस जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी 25,000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीस जामीन मंजूर केला.

यात अर्जदार/आरोपीतर्फे ऍड रितेश थोबडे ऍड पांडुरंग चवरे तर सरकारतर्फे ऍड सविता यादव यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel