सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करा — विष्णू कारमपुरी (महाराज)
सोलापूर दिनांक दि13/7/2024 जुना पुना नाका स्मशानभूमी जवळील ओपन ड्रेनेज चेंबर मध्ये पडून मंगल पिंटू कांबळे या महिलेचा मृत्यू झाला आहे यास जबाबदार मनपा प्रशासन असून मनपा आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूरचे महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी(महाराज) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
गेल्या दोन महिन्यापासून सोलापुरात अतिवृष्टीमुळे नाले तुंबून जाणे,ड्रेनेचे चेंबर फुटून व भरून पाणी वाहून जाणे,रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे निर्माण होणे,शहरातील महामार्गावर ,सर्वच रस्त्यावर व नागरी वस्त्यात पाणी वाहून जाणे अशामुळे सोलापूर शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे सध्या सोलापूर शहरात डेंगू ,टायफाईड ,डोकेदुखी ,अशा आजारांचे साथ सुरू आहे त्याचबरोबर संरक्षण भिंत नसलेल्या नालांमध्ये गुन्हेगारी माध्यमातून खूणा सारखे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.याहूनही भयंकर प्रकार म्हणजे रस्त्यावरील चेंबर वरचे झाकण निघालेले आहेत अशा मनपाच्या अनागोंदा कारभाराविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरप्रमुख विष्णू कारमपुरी(महाराज), उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहरउत्तर शहरप्रमुख महेश धाराशिवकर ,यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने करून निवेदनाद्वारे प्रशासनास वारंवार जाणीव करून दिले आहे
तरीही प्रशासनाचा निष्काळजी व दुर्लक्षपणामुळे जुना पुनानाका येथे घडलेल्या मंगला कांबळे या महिलेचे मृत्यूस जबाबदार मनपा आयुक्त व अधिकाऱ्यांची आहे म्हणून मंगला पिंटू कांबळे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या मनपा आयुक्तांसह अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कांबळे कुटुंबीयास २५लाख मदत करण्याचे मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सोलापूर महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज)यांनी केले आहे