महाराष्ट्र

शरद पवारांची प्रकृती स्थिर, बारामतीतील गोविंदबागेत पवारांना भेटायला नागरिकांची रीघ

पुणे: शनिवारी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमात उपस्थित असता अस्वस्थ वाटणाऱ्या शरद पवारांची (Sharad Pawar) तब्येत आता स्थिर आहे. डॉक्टरांनी पवारांची तब्येत तपासली असता ही माहिती समोर आली आहे.

त्यानंतर शरद पवारांनी नागरिकांना भेटायला सुरुवात केली आहे. दिवाळीनिमित्ताने पवारांना भेटण्यासाठी राज्यभरातील नागरिकांनी त्यांच्या बारामतीतील घरासमोर एकच गर्दी केली आहे.

शरद पवार दिवाळीनिमित्त बारामतीत आले आहेत. मागील दोन दिवसांपासून पवार बारामतीत आहेत. शनिवारी विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीदरम्यान त्यांना अस्वस्थ असल्याचे जाणवत होते. त्यानंतर त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना सांगितले असता सुळे यांनी तात्काळ येथील हृदयरोग तज्ञ डॉ. रमेश भोईटे, डॉ. सनी शिंदे यांच्यामार्फत तपासणी केली. सततचे कार्यक्रम आणि प्रवासामुळे त्यांना थकवा आल्याने डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, आज सकाळी डॉक्टरांकडून पवार यांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर तब्येत स्थिर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शरद पवार पुन्हा नागरिकांना भेटत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia