लैंगिक अत्याचार व ॲट्रॉसिटी प्रकरणी अटकेतील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर.
वरील प्रकरणात दिनांक ११/१०/२०२३ रोजी मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत भा.द.वि कलम ३७६(२)(n),४१७,४१८,४०६,३२३,५०४ व ३४ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारणा कायदा २०१५ (ॲट्रॉसिटी) चे कलम ३(१) (r),३(१)(s),३(२)(va) अन्वये आरोपी राजकुमार बबन मते(रा. चिखली ता. मोहोळ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये फिर्यादी ही विवाहित असून त्याची ओळख आरोपी सोबत सन २०१० मध्ये झाली होती. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर फिर्यादी व आरोपी हे सन २०१९ पासून पुणे येथे राहत होते. आरोपीने फिर्यादी च्या दुसऱ्या मुलाला नाव देतो व लग्न करून नांदवतो अशी हमी दिली होती ,परंतु आरोपीने फिर्यादी सोबत लग्न न करता तिचे फसवणूक करून तसेच तिच्या जवळील ४२०००/- रुपये घेऊन गेला होता. आरोपीच्या परिवारातील लोकांचा फिर्यादी व आरोपीचे लग्नाला विरोध होता आणि तसेच आरोपीने फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. आरोपीने आपला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. निलेश कट्टीमन्नी,ॲड. सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले.