सोलापूर बातमीशैक्षणिक

विजयसिंह मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे नीट परिक्षेत घवघवीत यश

उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील जाणता राजा बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विजयसिंह मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील सायन्स विभागातील १० विद्यार्थ्यांनी नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले.

नीट ही वैद्यकीय प्रवेशाची परिक्षा असून ग्रामीण भागातील या काॅलेजमधील घवघवित यश मिळविलेले अजिंक्य विनय कुलकर्णी या विद्यार्थ्यांने ७२० पैकी ६८५ गुण मिळवले तर प्रज्ञेश श्रीधर चव्हाण या विद्यार्थ्यांने पैकी ६४९ गुण घेतले.

या दोन्ही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना संस्थापक अध्यक्ष गणेश निळ यांनी ग्रामीण भागातूनही आज अनेक विदयार्थी नीटसारख्या परिक्षेत यशस्वी होत आहेत, आज खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातून एम. बी. बी. एस. चे महत्व पालकांनाही समजायला लागले आहे. अशी अनेक मुले घडविणारी आमची ग्रामीण भागातील संस्था आहे, असे मत व्यक्त करून संस्थापक गणेश निळ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रा. संजय जाधव, मुख्याध्यापक गंगाधर डोके, अंबादास रेडे, शिक्षक, यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कॉलेजवीषयी कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले. गुरुवर्याचे सहकार्य संस्थेचा विश्वास यामुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो, असे मत अजिंक्य कुलकर्णी या विद्यार्थ्यांने व्यक्त केले. शेवटी संस्थेच्या विश्वस्त प्राचार्या सुषमा निळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel